Massive Fire breaks Out On Ship Social Media
देश विदेश

Indonesia Ship Fire: २८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांच्या समुद्रात उड्या

Massive Fire breaks Out On Ship: इंडोनेशियात २८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. जीव वाचवण्यासाठी लोकांना समुद्रात उड्या मारल्या असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

Bharat Jadhav

इंडोनेशियामध्ये एका जहाजाला मोठी आग लागल्याची घटना घडलीय. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवाशी सैरवैर पळू लागले, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. ही घटना उत्तर सुलावेसीमधील तालिस बेटाजवळील केएम बार्सिलोना व्हीए येथे घडल्याचे वृत्त आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जहाजावर २८० हून अधिक लोक होते असे सांगण्यात येत आहे. भीषण आगीमुळे प्रवासी घाबरलेले दिसत होते. जहाजात मुलेही होती. काही जण आगीपासून वाचण्यासाठी समुद्रात उड्या मारताना दिसत होते. या घटनेनंतर समुद्रात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. समुद्रात उड्या मारलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान जहाजाला आग का कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. शोध आणि बचाव कार्यालयाचे प्रमुख जॉर्ज लिओ मर्सी रांडांग म्हणाले की, ही घटना उत्तर मिनाहासा तालिसे येथे घडली. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि बाहेर काढण्याचे काम पथकांकडून केले जात आहे. मदतीसाठी टो आणि बचाव जहाजे तसेच मच्छिमारांना पाचारण करण्यात आले. जवळच्या जहाजांनीही मदतीला धाव घेतली.

या आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण जहाज जवळजवळ जळून खाक झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT