Youtuber Saam
देश विदेश

Youtuber: 'आप कमाल की माल, मन कर राह है दबा दू', युट्यूबरचा महिलेसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; शिवीगाळ अन्..

Indian YouTuber Arrested: तुर्की महिलेबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी भारतीय युट्यूबर मलिक एसडी खान अडचणीत सापडला आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये त्याने हिंदी भाषेत एका तुर्की महिलेबद्दल अत्यंत अश्लील भाषेत कमेंट केली आहे.

Bhagyashree Kamble

तुर्की महिलेबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी भारतीय युट्यूबर मलिक एसडी खान (मलिक स्वैशबकलर) अडचणीत सापडला आहे. त्याने नुकतंच एका व्लॉगमध्ये तुर्की महिलेला हिंदी भाषेत आक्षेपार्ह भाषेत कमेंट केली. हिंदी समजत नसल्यामुळे ती महिला स्माईल देते. व्हिडिओ व्हायरल होताच तुर्की पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. तुर्की पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

युट्यूबर मलिकने अनेक व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत. यातील २ व्हिडिओ सध्या सोशल व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमध्ये युट्यूबर तुर्कीमधील एका दुकानात जातो आणि दुकानात भारतीय ध्वज नसल्याबद्दल दुकानदाराला आक्रमकपणे प्रश्न विचारतो. तसेच शिवीगाळ करतो.

तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका तुर्की महिलेला कळू नये म्हणून हिंदी भाषेत आक्षेपार्ह कमेंट करतो. (आप कमाल की माल हो, सब्र कर रहा हूँ, मेरा मन तो दबाने का कर रहा है, लेकिन उसके लिए रात का इंतजार करना होगा, आपको पिलाना पड़ेगा. उसके बाद ये हो सकता है), असं बोलून तो बाजूला होतो. त्यानंतर हिंदी कळत नसल्यामुळे तुर्की महिला हसते. या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

तुर्की अधिकाऱ्यांनी युट्यूबरला घेतलं ताब्यात

तुर्की टुडेच्या वृत्तानुसार, या प्रकरणात तुर्की अधिकाऱ्यांनी युट्यूबर मलिकला अटक केली आहे. तुर्की महिलेसोबत आक्षेपार्ह भाषेत संवाद साधल्याबद्दल त्याला ताब्यात घेतलं आहे. तुर्की प्रशासनाने अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण त्याला अटक झाली असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

मलिकने मागितली माफी

मलिकवर टीकेचा भडीमार झाल्यानंतर त्याने आपल्या युट्यूब चॅनेलमधून व्हिडिओ हटवले आहेत. तसेच त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने तुर्की भाषेत माफी मागितली आहे. तसेच हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? राजकीय घडामोडींना वेग

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT