Indian Navy Saam Tv
देश विदेश

Indian Navy: भारतीय नौदलाने अरबी समुदारात वाढवली गस्त, कारण काय?

Indian Navy News: गेल्या आठवड्यात गुजरातजवळ अरबी समुद्रात एका जहाजावर ड्रोन हल्ल्यामुळे स्फोट होऊन आग लागल्याची बातमी समोर आली होती. याची भारतीय नौदलाने गंभीर दखल घेतली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Indian Navy News:

गेल्या आठवड्यात गुजरातजवळ अरबी समुद्रात एका जहाजावर ड्रोन हल्ल्यामुळे स्फोट होऊन आग लागल्याची बातमी समोर आली होती. याची भारतीय नौदलाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच भारतीय नौदलाने अरबी समुदारात गस्त वाढवली आहे. याबाबत भारतीय नौदलाकडून एक परिपत्रक ही जाहीर करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिपत्रकात सांगण्यात आलं आहे की, भारतीय सागरी किनार्‍यापासून अंदाजे 700 नॉटिकल मैल अंतरावर एमव्ही रुएन या व्यापारी जहाजावर झालेली चाचेगिरीची घटना आणि पोरबंदरच्या दक्षिण-पश्चिम 220 नॉटिकल मैलांवर चेम प्लूटो (MV Chem Pluto) या व्यापारी जहाजावर अलीकडेच झालेला ड्रोन हल्ला भारताच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन (EEZ) जवळील सागरी घटनांमध्ये बदल झाल्याचे सूचित करते. (Latest Marathi News)

या घटनांना प्रतिसाद म्हणून, भारतीय नौदलाने मध्य/उत्तर अरबी समुद्रात सागरी गस्त ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये भरीव वाढ केली आहे. तसेच सैन्याची कुमक वाढवली आहे. विनाशक क्षेपणास्त्रे आणि आणि लढाऊ जहाजांचा समावेश असलेले कृतीदल सागरी सुरक्षा कार्य करण्यासाठी आणि कोणतीही घटना घडल्यास व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

संपूर्ण सागरी क्षेत्रात जागरुकता ठेवण्यासाठी लांब पल्ल्याची सागरी गस्ती विमाने आणि रिमोटली पायलेटेड एयरक्राफ्ट माध्यमातून हवाई देखरेख वाढवण्यात आली आहे. भारतीय एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन क्षेत्रात देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय नौदल तटरक्षक दलासोबत समन्वयाने कार्य करत आहे. राष्ट्रीय सागरी संस्थांच्या समन्वयाने भारतीय नौदलाकडून एकूण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT