Indian Railway Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video Fact Check : जवानांनी धक्का देत बंद ट्रेन सुरू केली, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? PIBने दिली माहिती

PIB Fact Check : व्हायरल व्हिडीओबाबत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं PIB अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

New Delhi News : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये काही जवान एका बंद पडलेल्या ट्रेनला धक्का मारताना दिसून येत होते. त्यामुळे ट्रेनसुद्धा धक्का मारुन सुरु केली जाते की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र या व्हिडीओबाबत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं PIB अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हटलं आहे.

व्हायरल व्हिडीओत काय दाखवलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक भारतीय जवानांसह काही लोक एकत्र ट्रेनला धक्का देत असल्याचे दिसत होतं. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, बंद पडलेल्या ट्रेनला लष्कराच्या जवानांनी ढकलले आणि सुरू केले.

फॅक्ट चेकमध्ये काय म्हटलं?

पीआयबीने फॅक्ट चेक केल्यानंतर म्हटलं की घटना सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की सैन्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी ट्रेन क्रमांक 12703 फलकनुमा एक्स्प्रेस धक्का देऊन सुरु केली. हा दावा खोटा असून दुसरी घटना चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहेत. ट्वीटनुसार ही घटना ट्रेन आगीची आहे, जी चुकीच्या पद्धतीने पसरवली जात आहे.

सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. मात्र, व्हिडिओ चुकीचा असल्यास लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. अशा परिस्थितीत वस्तुस्थिती तपासणे आणि पडद्यामागील सत्य बाहेर आणणे ही आपली जबाबदारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT