Sunita Williams Live update  
देश विदेश

Sunita Williams : वेलकम ऑन अर्थ.. ९ महिन्यानंतर सुनीता विल्यम्स परतल्या, गुजरातमध्ये जल्लोष

Sunita Williams News : तब्बल ९ महिने आणि १४ दिवसानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत. प्लोरिडा येथे त्यांचं यान लँड झालं.

Namdeo Kumbhar

Sunita Williams Live update : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मोहिमेवर गेलेल्या भारतीय-अमेरिकन वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत. ९ महिने १४ दिवसानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत. प्लोरिडामध्ये सुनीता विल्यम्स यांचं यानं लँड झाले, तेथून स्पेस स्टेशन पोहचण्यासाठी १७ तास लागले. सुनीता विल्यम्स पृथ्वीवर पोहचल्यानंतर गुजरातमधील मूळ गावी जल्लोष साजरा करण्यात आला. सुनीता विल्यम्स पृथ्वीवर पोहचल्याचा व्हडीओ नासाने एक्सवर पोस्ट केला आहे.

अमेरिकन वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच व्हिल्मोर यांचं यान १९ मार्च रोज पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी फ्लोरडा येथे लँड झाले. त्यांच्यासोबत क्रू-9 चे दोन सदस्य अंतराळवीर निक हेग आणि अलेक्सांद्र गोरबुनोवही परतले आहेत. सुनीता विल्यम्स यांचं ड्रॅगन स्पेसक्राफ्ट भारतीय वेळेनुसार, आज पहाटे ३.२७ मिनिटांनी फ्लोरिडा येथे लँड झाले. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार १८ मार्च २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून (ISS) रवाना झाले होते. स्पेसक्राप्ट अवकाशात गेल्यानंतर तापमान १६५० डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त होते. ७ मिनिटांपर्यंत कम्युनिकेशन बॅकआऊट झाले होते.

पॅराशूटद्वारे येणारे ड्रगन कॅप्सूल समुद्रात लँड झाले. त्यामध्ये सुनीता विल्यम्स आणि बूच व्हिल्मोरसह सर्व अंतराळवीर सुरक्षित परतले. विल्यम्स अन् इतर सहकाऱ्यांचे लँडिंग होत होते, त्यावेळी नासाच्या सर्व शास्त्रज्ञांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. दरम्यान, कॅप्सूल समुद्रात लँड झाल्यानंतर १० मिनिटे त्याचं सिक्युरीटी चेक करण्यात आले. कॅप्सूल थेट उघडता येत नाही. आतील आणि बाहेरील तापमान समान होणं गरजेचं आहे. कॅप्सूल पृथ्वीरील वातावरणात प्रवेश करतं, त्यावेळी तापमान जास्त वाढतं, त्यामुळेच त्याला समुद्रात उतरवले जाते अन् सामान्य तापमान केलं जातं.

५ जून २०२४ रोजी सुनीता विल्यम्स आणि बूच व्हिल्मोर यांनी केप कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. १० दिवसांच्या मिशनसाठी अंतराळात गेले होते मात्र, यानामधून हीलियमची गळती सुरू झाली, त्यात वेग कमी झाल्यामुळे नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकले होते. अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT