Russia-Ukraine war  Yandex
देश विदेश

Russia-Ukraine War: भारत युद्ध थांबवणार? रशिया-युक्रेन युद्धावर भारत-चीनची मध्यस्थी?

Russia-Ukraine war: रशिया आणि युक्रेनमध्ये दोन अडीच वर्षापासून युद्ध सुरू आहे. या दोन्ही देशातील युद्धामुळे जगभरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. आता या दोन्ही देशात शांतता स्थापित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. भारत दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करत युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

Bharat Jadhav

गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धावर तोडगा निघणार आहे...यासाठी भारत मध्यस्थी करणाराय...युद्ध थांबवण्यासाठी रशियाने काय अटी ठेवल्यायत...? युक्रेन रशियाच्या अटी मान्य करणार का.? पाहुयात हा रिपोर्ट.

अडीच वर्षांपासून सुरू असलेलं रशिया-युक्रेन युद्धावर आता तोडगा निघण्याची शक्यताय...कारण, भारत, चीन किंवा ब्राझील दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थी करू शकतात...युद्ध थांबवून या दोन्ही देशांत शांतता नांदावी यासाठी मोदींनीही प्रयत्न केले...दोन्ही देशांचे दौरे केले आणि युद्ध थांबवण्याबाबत दोन्ही राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली

रशिया-युक्रेन युद्धात भारताची मध्यस्थी?

पंतप्रधान मोदी दोन महिन्यांपूर्वी 8 जुलै रोजी रशियाला गेले होते

यावेळी मोदींनी पुतीन यांच्याशी युद्ध थांबवण्याबाबत चर्चा केली

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युद्धात तोडगा काढण्याबाबत तयारी दाखवली

लगेचच पंतप्रधान मोदी 23 ऑगस्ट रोजी युक्रेनच्या दौऱ्यावर गेले

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी भारतात शांतता शिखर परिषद आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.

भारत नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलाय असं मोदींनी म्हटलं होतं...पुतिन यांना भेटल्यानंतरही मोदींनी ही युद्धाची वेळ नाही असं म्हटलं होतं. यावेळी पुतिन यांनी युद्ध थांबवण्यासाठी दोन अटी ठेवल्या.

युद्धविरामसाठी पुतीन यांच्या दोन अटी

युक्रेनला डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझिया येथून आपले सैन्य मागे घ्यावे लागेल.

पुतीन यांची दुसरी अट

युक्रेन कधीही नाटोचा भाग होणार नाही.

पुतिन यांच्या या दोन अटी असल्या तरी या अटी युक्रेनने मान्य करण्यास नकार दिलाय...तरी देखील भारत, चीन आणि ब्राझील रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करणार आहेत...त्यामुळे या मध्यस्थीला यश येणार का याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT