IND vs China Latest News Saam TV
देश विदेश

IND vs China : लाकडी काठ्या, बांबू आणि ६०० चिनी सैनिक; भारतीय जवानांनी कसं रोखलं VIDEO आला समोर

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय लष्कराचे जवान आणि चिनी सैन्यांमध्ये झटापट झाली.

साम टिव्ही ब्युरो

IND vs China Latest News : अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय लष्कराचे जवान आणि चिनी सैन्यांमध्ये झटापट झाली. या झटापटीत दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना ९ डिसेंबरची आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत भारतीय लष्कराचे किमान 20 जवान जखमी झाले आहेत. त्याचबरोबर चिनी सैन्याचेही मोठे नुकसान झाले आहे.  (Latest Marathi News)

जखमींवर गुवाहाटी येथील सैनिक (India China) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारताचा एकही जवान गंभीर नसला तरी या झटापटीतनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या कमांडर्सनी चीनच्या कमांडरसोबत फ्लॅग मीटिंग केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनेने दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबरच्या रात्री तवांगमध्ये चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पोहचले होते. यावेळी चीनचे जवळपास 600 हून अधिक सैनिक होते. चीनचे सैन्य समोर आल्यानंतर भारतीय जवानांनी सुद्धा त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. चीनचे सैन्य संपूर्ण तयारीनिशी आले होते. मात्र, त्यांना भारतीय जवानांनी केलेल्या तयारीची कल्पना नव्हती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमधील सैन्यांमध्ये जोरदार झटापट झाली. भारतीय लष्कराने चिनच्या 600 जवानांना चोख प्रत्त्युतर दिलं. या झटापटीत दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक जखमी झाले. जखमी चिनी सैनिकांची संख्या भारतीय सैनिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. या चकमकीत 20 भारतीय जवान जखमी झाल्याचे समोर आले असून त्यांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.

खरेतर, अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील एलएसीजवळील काही भागांवर भारत आणि चीन दोन्हीही दावा करतात. अशा स्थितीत 2006 पासून अशी प्रकरणे वारंवार समोर येत आहेत. दरम्यान, दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये 15 जून 2020 च्या घटनेनंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. या झटापटीत चीनचेही शेकडो सैनिक मारले गेले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील शनिवारवाडा परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडलं

वर्ष श्राद्धाला जाताना काळाचा घाला! कसारा घाटात ट्रक कंटेनर दुचाकीवर उलटला; कंटेनरखाली दबून पती-पत्नीचा मृत्यू

Aloe Vera Benefits For Skin: चेहऱ्यावर कोरफड लावल्याने काय होतं? जाणून घ्या ५ जबरदस्त आश्चर्यकारक फायदे

Blouse Design: ब्रायडल,रिसेप्शन आणि कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट; २०२६मध्ये ट्रेंडी आहेत ब्लाउजचे हे स्टायलिश डिझाइन्स

Raw amla vs amla juice : कच्चा आवळा की आवळा रस; आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर?

SCROLL FOR NEXT