India vs china War Video  Saam TV
देश विदेश

India vs China: लडाखमध्ये भारतीय मेंढपाळांची चिनी सैनिकांसोबत झटापट; घटनेचा VIDEO आला समोर...

India vs China War: लडाखमध्ये भारतीय मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमध्ये चांगलीच झटापट देखील झाली. या थरारक प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.

Satish Daud

India vs China War Latest News

जम्मूच्या पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळ चीनने पुन्हा एकदा दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना रोखण्याचा प्रयत्न केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावर निशस्त्र भारतीय मेंढपाळांनी धाडस दाखवत सशस्त्र चिनी सैनिकांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. भारतीय मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमध्ये चांगलीच झटापट देखील झाली. या थरारक प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओ पाहून अनेकांनी चिनी सैन्यावर (China) टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, भारतीय मेंढपाळांनी आमच्या वाहनांवर दगडफेक केली असा दावा काही चिनी सैनिकांनी केला आहे. चीनकडून अशी प्रक्षोभक कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

याआधीही चीनकडून लडाख भागात अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैनिकांनी भारतीय (Indian) मेंढपाळांना जनावरे चारण्यापासून रोखले.

यानंतर चिनी सैनिक आणि भारतीय मेंढपाळांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. यावेळी भारतीय मेंढपाळांनी चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं. चिनी सैनिक सशस्त्र होते. (Latest Marathi News)

तर भारताचे स्थानिक मेंढपाळ निशस्त्र होते. मात्र, असे असूनही ते चिनच्या सैनिकांना उत्तर देण्यापासून मागे हटले नाहीत. चुशुल समुपदेशक कोंचोक स्टॅनजिन यांनी दोन्ही पक्षांमधील संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये चिनी सैनिक मेंढपाळांना थांबवताना दिसत आहेत आणि मेंढपाळ त्यांच्याशी वाद घालत आहेत.

त्या ठिकाणाहून परतण्यास नकार देत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिक आणि पूर्व लडाखमधील स्थानिक मेंढपाळांमध्ये झालेल्या झटापटीचा हा व्हिडीओ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील आहे. व्हिडीओमध्ये चिनी सैनिक भारतीय मेंढपाळांसोबत वाद घातलाना दिसून येत आहे.तसेच ते गुराख्यांना परत जाण्यास सांगत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाडाला शीर लटकवलं, जंगलात मृतदेहाचे तुकडे सापडले, अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक चढणार बोहल्यावर; मराठी कलाकारांनी केलं सोहमचं केळवण, पाहा VIDEO

Shengdana Puranpoli: शेंगदाणा पुरणपोळी कशी बनवायची? स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी जाणून घ्या

Maharashtra Live News Update: सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या समर्थनात आंदोलन

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' तारखेपासून लागू होणार आठवा वेतन आयोग; समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT