C 295 Aircraft India Saam Tv
देश विदेश

C-295 Aircraft: शत्रू देशांचे धाबे दणाणणार! C-295 विमान भारतीय वायुदलाच्या ताफ्यात होणार दाखल, जाणून घ्या काय आहे खास...

C 295 Aircraft Specifications: शत्रू देशांचे धाबे दणाणणार! C-295 विमान भारतीय वायुदलाच्या ताफ्यात होणार दाखल, जाणून घ्या काय आहे खास...

Satish Kengar

C 295 Aircraft India:

भारताची हवाई ताकद आणखी वाढणार आहे. स्पेन येथील लवकरच पहिले C-295 सैन्य विमान भारतात उतरणार आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख हे विमान घेण्यासाठी स्पेनला पोहोचल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने 56 सी-295 विमानांसाठी एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत करार केला होता, जे Avro-748 विमानांची जागा घेतील.

विशेष म्हणजे भारताला स्पेनकडून 16 सी-295 विमाने मिळणार आहेत. तर उर्वरित 40 विमानांची निर्मिती गुजरातमधील वडोदरा येथे केली जाणार आहे. 25 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर विमान उतरण्याची शक्यता आहे. भारताने हा करार 21 हजार कोटी रुपयांना केला होता. करारानुसार 4 वर्षात 16 विमाने दिली जाणार आहेत.

भारताला मे 2024 पर्यंत दुसरे C-295 विमान मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याच वेळी सर्व 16 विमाने ऑगस्ट 2025 पर्यंत भारतीय हवाई दलाला दिली जातील. यातच पहिले स्वदेशी विमान, जे भारतात तयार होणार आहे, ते सप्टेंबर 2026 पर्यंत वितरित केले जाईल. तसेच इतर 39 विमाने ऑगस्ट 2031 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी या विमान बांधकाम प्रकल्पाची पायाभरणी केली होती. येथे Tata Advanced Systems Limited आणि Airbus Defence and Space S.A C-295 विमाने तयार करतील. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. ज्यामध्ये सैन्य विमानाची निर्मिती खासगी कंपनीकडून केली जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी कारणांसाठीही केला जाऊ शकतो.'

विमानात काय हे खास?

याबाबत माहिती देताना संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 5-10 टन क्षमतेचे हे वाहतूक विमान अनेक परिस्थितींमध्ये विविध मोहिमा पार पाडू शकते. यामध्ये 11 तास उड्डाण करणे, तसेच कमी उंचीवर टेक ऑफ आणि लँडिंगचे वैशिष्ट्य आहे. विशेष बाब म्हणजे ते वाळवंट ते सागरी वातावरणात नियमितपणे दिवसा, तसेच रात्रीच्या लढाऊ ऑपरेशनचे संचालन करू शकते. हे विमान ताशी 480 किमी वेगाने मोहिमा राबवू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT