ai  saam tv
देश विदेश

Indian Army: भारताच्या शत्रूंना उडवणार AI गन

आता कुरापतखोर पाकिस्तान आणि चीन्यांचे धाबे दणाणलेत.. कारण भारताने थेट एआय मशीन गनची यशस्वी टेस्टिंग केलीय. या गनची वैशिष्ट्ये काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Omkar Sonawane

भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांची धुळधाण उडवणारी ही आहे एआय सक्षम नेगेव लाईट मशीन गन....याच गनमुळे पाकिस्तान आणि चीनला पळता भुई थोडी होणार आहे...कारण तब्बल 14 हजार फूट उंचीवर एआय सक्षम नेगेव लाईट मशीन गनची यशस्वी चाचणी भारताने केलीय आणि त्यामुळे भारताच्या शत्रूंचे धाबे दणाणलेत. मात्र काय खास आहे या मशीन गनमध्ये? पाहूयात....

मशीन गनची वैशिष्ट्ये

जगातील धोकादायक मशीन गनपैकी एक

थर्मल आणि ऑप्टिकल सेन्सर्सद्वारे अचूक निशाणा

हवामान, अंतर आणि तापमान यासारख्या घटकांचा विचार करून गोळीबार

सैनिक तैनात करणे कठीण असलेल्या ठिकाणी उपयुक्त ठरणार

प्रति मिनिट 850 ते 1 हजार 50 राऊंड फायर करण्याची क्षमता

मशीन गनची 300 ते 1 हजार मीटर फायरिंग रेंज

14 हजार फूट उंचीवर यशस्वी चाचणी

ही सगळी या मशीन गनची वैशिष्ट्य असली तरी तिचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे या गनमध्ये शत्रूला ओळखून स्वतःहून गोळीबार करण्याची क्षमता आहे. होय, हे शस्त्र कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयने सुसज्ज आहे, जे शत्रूंना ओळखू शकतं आणि स्वतःहून गोळीबार करू शकतं. त्यामुळे भविष्यातील युद्धांमध्ये, विशेषतः सीमावर्ती डोंगराळ भागात हे तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.. जिथे मानवी सैनिक तैनात करणं धोकादायक आहे, तिथे हे शस्त्र शत्रूचा खेळ खल्लास करू शकतं.

देहरादूनच्या BSS मटेरियल लिमिटेड या कंपनीनं भारतीय सैन्याच्या सहकार्याने तयार केलेल्या गनमुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे..त्यामुळेच पाकिस्तान थरथर कापतोय.. आता चीन्यांनी आणि पाकड्यांनी कुरापत केल्यास त्यांची खैर नाही, हे मात्र नक्की....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

कावळ्यासारखा दिसणारा 'हा' पक्षी वर्षातून एकदाच फक्त पावसाचे पाणी पितो

Famous Actress : "मला बिकिनी घालून दाखव..."; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अश्लील मागणी

SCROLL FOR NEXT