नवी दिल्ली - भारतात कोरोना (Corona) विषाणूची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात ओमिक्रॉनच्या (Omicron) BA.2.75, BA.2.38, BA.4 आणि BA.5 या नवीन व्हेरियंटने आणखी चिंता वाढली आहे. दरम्यान, देशात नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 13,615 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 20 रुग्णांच्या मृत्यूनंतर, संपूर्ण भारतात संसर्ग कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आता 5,25,474 इतकी झाली आहे.
हे देखील पाहा -
भारतात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या अजूनही 1लाख पेक्षा जास्त आहे. गेल्या 24 तासांत या आकडेवारीत 330 रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 13,615 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,36,52,944 वर पोहोचली आहे. देशातील एकूण प्रकरणांमध्ये सक्रिय रुग्णांची टक्केवारी 0.30 आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील दैनिक सकारात्मकता दर 3.23 टक्के आहे. तर 98.50 टक्के रिकव्हरी रेट आहे.
कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार लसीकरणावर भर देत आहे. आतापर्यंत लसीकरणाची संख्या 1,99,00,59,536 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 10,64,038 नागरिकांनी लस घेतली आहे.
महाराष्ट्राची अवस्था
गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 1,189 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1529 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 18,027 वर गेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.