Corona Virus latest News Saam Tv
देश विदेश

India Corona Update: देशात 10,256 नव्या रुग्णांची नोंद, 68 रुग्णांचा मृत्यू

सक्रिय रुग्णांची संख्या 90 हजारांवर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशातील कोरोना (Corona) संसर्गामध्ये चढ-उतार कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या कमी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 10 हजार 256 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच मंगळवारी देशात 10 हजार 725 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे.

हे देखील पाहा -

तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात देशात 13 हजारहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 13 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच गेल्या 24 तासात 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 27 हजार 556 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात 1887 कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात गेल्या 24 तासांत 1887 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 2190 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,30, 793 कोरोनाबाधित बरे झाले आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

ठाकरे रात्री १२ वाजता कुठे जायचे? सकाळी ६ वाजता परतायचे; बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT