Nitish Kumar Saam Tv
देश विदेश

Nitish Kumar: इंडिया आघाडीने नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची दिली ऑफर, जेडीयू नेत्याचा दावा; काँग्रेसने काय दिली प्रतिक्रिया?

India Alliance News: नितीश कुमार यांना इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाची ऑफर दिली आहे, असा दावा केसी त्यागी यांनी केला आहे. यावरच काँग्रेसनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Satish Kengar

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाची ऑफर दिली आहे, असा दावा जेडीयू नेते केसी त्यागी यांनी केला आहे. यावर आता काँग्रेसनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सांगितले की, 'आमच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही.'

काय म्हणाले होते जेडीयू नेते?

जेडीयू नेते केसी त्यागी एका मुलाखतीत म्हणाले होते की, 'राजकारणाचा खेळ असा आहे की, ज्यांनी नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे राष्ट्रीय संयोजक बनवण्यास नकार दिला, तेच आता नितीश यांना पंतप्रधान बनवण्याची ऑफर देत आहेत.'

त्यागी यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांवर नितीश कुमार यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोपही केला. त्यांचा पक्ष इंडिया आघाडीत परतणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, 12 जागांसह नितीश कुमार यांचा जेडीयू एनडीए आघाडीत भाजपचा महत्त्वाचा सहयोगी म्हणून पुढे आला आहे.

दरम्यान, बिहारची राजधानी पाटणा येथे नितीश कुमार यांचे मोठे पोस्टर लावण्यात आले असून त्यावर 'टायगर जिंदा है' असे लिहिले आहे. नितीश कुमार यांची मतदारांमध्ये असलेली लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे पोस्टरवर लिहिलेल्या संदेशावरून स्पष्ट झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला आपली राजकीय समीकरणे सोडवण्यासाठी जेडीयूची गरज आहे.

यातच बिहारमध्ये एनडीएच्या दोन्ही मित्रपक्ष भाजप आणि जेडीयूने 12-12 जागा जिंकल्या आहेत. मात्र केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पुरेशा जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे एनडीएच्या मित्रपक्षांवर अवलंबित्व वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT