UP : सुवर्ण व्यवसायात उत्तरप्रदेशाच्या राजधानीत आहे मराठी माणसांची मक्तेदारी Saam TV
देश विदेश

UP : सुवर्ण व्यवसायात उत्तरप्रदेशाच्या राजधानीत आहे मराठी माणसांची मक्तेदारी

सुवर्ण अलंकार घडवण्याच्या त्यांच्या अंगभूत कौशल्यामुळे, मराठी माणसांनी अगदी कमी वेळातच या परमुलखात आपला जम बसवलाय.

विनोद तळेकर

विनोद तळेकर -

लखनऊ : उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये मराठी माणसांनी एखाद्या व्यवसायात मक्तेदारी निर्माण केलीय, असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल. पण हे खरंय, कारण लखनऊच्या (Lucknow) सुवर्ण व्यवसायात काहीशे मराठी कुटुंबांची मक्तेदारी आहे.

सांगली (Sangli) आणि आसपासच्या परिसरातल्या सतत दुष्काळाला कंटाळून अनेक कुटुंबानी परमुलख आपलासा केला आहे. अशीच काही कुटुंब रोजगार आणि व्यवसायाच्या शोधात सत्तर ऐंशीच्या दशकात लखनौला आली. आणि सुवर्ण अलंकार घडवण्याच्या त्यांच्या अंगभूत कौशल्यामुळे, त्यांनी अगदी कमी वेळातच या परमुलखात आपला जम बसवला आहे.

य़ुपीतील (UP) लखनऊच्या चौक चौराहा परिसरातल्या सोन्याच्या पेढ्यांमधले बहुतांश कारागिर हे मराठी आहेत. तर काही पेढ्यांचे मालकही मराठी आहेत. सोने गलाई, होलमार्कींग यामध्ये तर मराठी कारागिरांचं प्रमाण शतप्रतिशत आहे.

लखनऊच्या आसपासच्या जिल्ह्यातही आता या सुवर्ण कारागिरांनी आपल्या शाखा विस्तारायला सुरूवात केलेय. त्यामुळे नजिकच्या काळात संपूर्ण उत्तर प्रदेशात या मराठमोळ्या सुवर्णकारांचा डंका वाजल्यास आश्चर्य वाटालायला नको असंच म्हणावं लागेल.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026: चारधाम यात्रेला जाताय? 'हे' सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही दर्शन, काय आहे नियम?

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Post Office Scheme : ₹१००० गुंतवा अन् महिन्याला मिळवा २०, हजार व्याज; पोस्टाच्या या योजनेत व्हाल मालामाल

भाजपच्या मोर्चावर ताईंनी बाटली फेकून मारली; 'त्या' घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

Actor House Burgled: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी; मोलकरणीने लंपास केले लाखोंचे दागिने आणि रोकड

SCROLL FOR NEXT