इम्रान खान यांनी तालीबान्यांना ठरवले 'सामान्य नागरिक' Saam Tv
देश विदेश

इम्रान खान यांनी तालीबान्यांना ठरवले 'सामान्य नागरिक'

अफगाणिस्तानात (Afganistan) दहशत पसरविणारे तालिबानी (Talibani) पाकिस्तान (Pakistan) सामान्य नागरिक असल्याचे दिसते.

वृत्तसंस्था

अफगाणिस्तानात (Afganistan) दहशत पसरविणारे तालिबानी (Talibani) पाकिस्तान (Pakistan) सामान्य नागरिक असल्याचे दिसते. अफगाणिस्तानात अशांतता पसरवण्यास अमेरिकाच जबाबदार असल्याचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की अफगाणिस्तानात शांतता निर्माण करण्यासाठी युद्धा नव्हे तर राजकीय बंदोबस्ताची आवश्यकता आहे. जेव्हापासून अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडला आहे, तेव्हापासून तालिबानी सैनिकांचा जोश खूपच वाढला आहे. आता जवळजवळ दररोज अफगाण सुरक्षा दल आणि तालिबानी यांच्यात संघर्ष होत असून त्यात बरेच लोक ठार होत आहेत.

इम्रान खान एका टीव्ही मुलाखती दरम्यान म्हणाले की अमेरिकेने सर्व काही खराब केले आहे. याचा परिणाम आता अफगाणिस्तानला सहन करावा लागला आहे. अफगाणिस्तानाच्या सद्य समस्येचे निराकरण युद्धातून नव्हे तर राजकीय कराराने शक्य आहे. इम्रान यांनी या काळात तालिबानला सामान्य नागरिक म्हणून संबोधले आहे.

दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या प्रश्नावर इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानमधील निर्वासित छावण्यांमध्ये लाखो अफगाणिस्तान राहतात. गृहयुद्ध असेच चालू राहिले तर अफगाणिस्तानातून अधिक निर्वासित येतील. त्यांचे ओझे देशाला सोसणे शक्य होणार नाही. एक प्रकारे इम्रान म्हणाले की, तालिबान हे पश्तूती आहेत आणि जर अफगाणिस्तानातील परिस्थिती सामान्य झाली नाही तर आमच्या बाजूचे पश्तूनीही त्यात सामील होतील. तालिबान हे दहशतवादी नसून ते सामान्य नागरिक आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अहवालानुसार, पाक समर्थीत दहशतवादी संघटनेचे 6000 सैनिक तालिबानच्या वतीने अफगाणिस्तानात लढत आहेत. यामुळे अफगाणिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मात्र, इम्रान यांनी या गोष्टिला नकार दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT