Shraddha case  Saam TV
देश विदेश

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे; CCTV फुटेजमध्ये धक्कादायक माहिती उघड

श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहे.

वृत्तसंस्था

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडाच्या तपासात गुंतलेल्या दिल्ली पोलिसांच्या हाती आता एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे. पोलिसांना आफताबचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. यामध्ये आरोपी आफताबच्या हातात एक बॅग दिसत आहे. यानंतर दिल्ली पोलिसांच्या पथकाने ही बॅग ताब्यात घेतलीआहे. याशिवाय दिल्ली पोलीस (Delhi Police) आज श्रद्धाचा मित्र राहुलची चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे.

हे सीसीटीव्ही फुटेज १८ ऑक्टोबरचे असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताबच्या हातात बॅग दिसत आहे. आफताब 18 ऑक्टोबर रोजी श्रद्धाच्या मृतदेहाचे उरलेले तुकडे फेकण्यासाठी गेला असावा असा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताब तीन वेळा ये-जा करताना दिसत आहे. दुसरीकडे, काही पुराव्यांसाठी दिल्ली पोलीस सलग सहाव्या दिवशी मेहरौलीच्या जंगलात तपास करत आहेत. पोलिसांचा मोठा ताफा जंगलात तपास करत आहेत.

पोलिसांनी आफताब आणि श्रद्धा यांचे कपडे जप्त केले

दिल्ली पोलिसांनी आफताबच्या घरात असलेले सर्व कपडे ताब्यात घेतले आहेत. यातील बहुतांश कपडे आफताबचे आहेत. याशिवाय पोलिसांना तेथून श्रद्धाचे कपडेही मिळाले आहेत. दोघांचेही कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, कारण आतापर्यंत त्याने हत्येच्या दिवशी घातलेले कपडे आणि श्रद्धाने घातलेले कपडे पोलिसांनी जप्त केलेले नाहीत. घरातून जप्त केलेल्या कपड्यांवरून नक्कीच काही सुगावा लागतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दिल्ली पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाचे 13 तुकडे मिळाले आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप श्रद्धाचे शीर सापडलेले नाही, तसेच तिचा मोबाईलही सापडलेले नाही.

काय आहे श्रद्धा खून प्रकरण?

मुंबईतील शेफ आणि फोटोग्राफर आफताब पूनावाला याने दिल्लीत त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वलकरची हत्या केली होती. 18 मे रोजी त्याने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात घरात सुमारे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर ते तुकडे जंगलात फेकून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात

High blood pressure: कसं ओळखाल की तुमचा रक्तदाब वाढलाय?

परवेझनं अल्पवयीन हिंदू मुलीला जाळ्यात अडकवलं,८ मित्रांना अश्लील व्हिडिओ पाठवला; खेडामध्येही अमरावतीसारखा कांड

Death News: प्रसिद्ध निर्मात्यावर दु:खाचा डोंगर; अक्षय तृतीयादिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

SCROLL FOR NEXT