Weather Update Today News  AI image
देश विदेश

Rain Alert : धो धो पाऊस कोसळणार! १५ राज्यांना पावसाचा इशारा; ताशी ७० च्या वेगाने वारे वाहणार

Weather Update Today News : देशभरात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. १५ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज असून ताशी ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात थंडीची चाहूल.

Alisha Khedekar

  • भारतीय हवामान विभागाने १२ नोव्हेंबर रोजी देशातील १५ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

  • दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता

  • ताशी ६५ ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज

  • महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात

देशातील अनेक भागांमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असतानाच काही राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो. भारतीय हवामान विभागाने १२ नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज देशातील १५ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्येही हवामान बदलू शकते. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून जोरदार वारे वाहू शकतात.

पूर्व आणि मध्य भारतातील काही राज्यांनाही या बदलत्या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्येही पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ६५ ते ७० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. पावसामुळे काही भागांतील तापमानात बदल जाणवू शकतो. नागरिकांनी हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

महाराष्ट्रात हुडहुडी!

महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली असून तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरायला सुरुवात झाली आहे. दरम्यान निफाड येथे १२ अंश सेल्सिअस तापमान आज नोंदवले गेले. तसेच राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबई हादरली! १० जणांकडून नवरा-बायको अन् मुलीवर जीवघेणा हल्ला, लाथाबुक्क्या अन् काठ्यांनी मारहाण

Maharashtra News Live Update: जोगेश्वरीत फटाक्यामुळे इमारतीला भीषण आग

Thursday Horoscope : आज या ४ राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळणार आनंदाची बातमी; वाचा आजचे भविष्य

महाराष्ट्र हादरला! एकाच कुटुंबातील ८ चिमुकल्यांना विषबाधा, एका मुलीचा मृत्यू, ७ गंभीर, नेमकं काय घडलं?

NCP Merger : सुनेत्रा पवारांचं विलिनीकरणावर सूचक विधान, नेमका अर्थ काय?

SCROLL FOR NEXT