CM Arvind Kejriwal Latest News In Marathi  Saam TV
देश विदेश

'नोटेवर महात्मा गांधींसह लक्ष्मी-गणेशाचाही फोटो असावा, दोघांच्या आशीर्वादाने अर्थव्यवस्था सुधारेल'

नोटेवर महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी आणि भगवान गणेशाचे फोटो लावण्यात यावेत, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

Nandkumar Joshi

Arvind Kejriwal Latest News : नोटेवर महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी आणि भगवान गणेशाचे फोटो लावण्यात यावेत, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. भारतीय चलनावर एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणेशाचे फोटो असावेत, अशी माझी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते बोलत होते. इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे. तेथे ८५ टक्के लोकसंख्या मुस्लिम समाजाची आहे. दोन टक्के हिंदू आहेत. तरीही त्यांनी त्यांच्या चलनावर गणेशाचा फोटो लावला आहे, असे केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते बोलत होते. इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे. तेथे ८५ टक्के लोकसंख्या मुस्लिम समाजाची आहे. दोन टक्के हिंदू आहेत. तरीही त्यांनी त्यांच्या चलनावर गणेशाचा फोटो लावला आहे, असे केजरीवाल म्हणाले. (Latest Marathi News)

आमचे कुटुंबही श्रीमंत व्हायला हवे, अशी इच्छा आहे. त्यासाठी खूप मोठे पाऊल उचलायला हवे. चांगल्या शाळा, रुग्णालये, मुलभूत सोयीसुविधा जनतेला उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. देवी-देवतांचे आशीर्वाद असले तरच, हे सर्व शक्य आहे, असेही केजरीवाल म्हणाले.

पूजेवेळी मनात हा विचार आला

दिवाळीनिमित्त लक्ष्मी-श्रीगणेशाची पूजा करताना हा विचार माझ्या मनात आला. यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल, असा माझा दावा नाही. पण देवाचे आशीर्वाद मिळतील. इंडोनेशिया हे करू शकतो, मग आपण का नाही. लक्ष्मी ही समृद्धी आणि संपन्नतेची देवता आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT