Rahul Gandhi MSP Promise Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi MSP Promise: केंद्रात सरकार आल्यास एका मिनिटात एमएसपी लागू करू, राहुल गांधींची घोषणा

Rahul Gandhi News: आज उत्तर प्रदेश आज भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे एकाच मंचावर दिसले. या दोघांनीही 'भाजपा हटाओ-देश बचाओ, यूपी में 80 हराओ और संविधान बचाओ', अशा घोषणा दिल्या आहेत.

Satish Kengar

Rahul Gandhi MSP Promise:

आज उत्तर प्रदेश आज भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे एकाच मंचावर दिसले. या दोघांनीही 'भाजपा हटाओ-देश बचाओ, यूपी में 80 हराओ और संविधान बचाओ', अशा घोषणा दिल्या आहेत.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, द्वेषाविरुद्धची लढाई प्रेमानेच जिंकता येते. आमचे सरकार आल्यास आम्ही एका मिनिटात एमएसपी लागू करू, अशी घोषणा त्यांनी केली. तर अखिलेश यादव म्हणाले, हे प्रेमाचे शहर आहे. इथून हवं तितकं प्रेम घ्या आणि पुढच्या प्रवासात हे प्रेम वाटत जा.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी भारत जोडो न्याय यात्रेसह अलिगढ-हाथरस मार्गे आग्रा येथील तेडी बगिया येथे पोहोचले. येथे त्यांना अखिलेश यादव यांचा पाठिंबा मिळाला. तिन्ही नेत्यांनी डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.  (Latest Marathi News)

देशात पसरलेल्या द्वेषाच्या विरोधात उभे राहणे हे आघाडीचे पहिले काम असल्याचे राहुल गांधी म्हणाले. आज गरीब, शेतकरी, महिलांवर अन्याय होत आहे. त्यामुळे यात्रेत न्याय हा शब्द जोडला गेला आहे. ते म्हणाले की, भारताचा अर्थसंकल्प बनवणाऱ्या लोकांमध्ये गरीब, दलित आणि मागासवर्गीय लोकांचा सहभाग नाही.

अखिलेश यादव म्हणाले की, गरीब आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे. हे आज घडत नाही. शेतकरी आणि गरिबांवर अन्याय होत आहे. देशातील शेतकरी दु:खी आहे. त्यांची एमएसपीची मागणी पूर्ण झाली पाहिजे. तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा होत असल्याचे ते म्हणाले. नोकऱ्या आणि रोजगार नाहीत. तरूण पदवीला जाळून आत्महत्या करत असल्याचंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : शिंदेंना जागा दाखवली जातेय, ३५ आमदार भाजपात जाणार, महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा

New Labour Codes: केंद्राचा मोठा निर्णय! आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

SCROLL FOR NEXT