ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर Saam Tv
देश विदेश

ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन CISCE 10 वी व 12 वीचे निकाल ICSE, ISC Result 2021 जाहीर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन CISCE 10 वी व 12 वीचे निकाल ICSE, ISC Result 2021 जाहीर केले आहेत. ISC बोर्डाचा निकाल म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल ९९.९८ टक्के लागला आहे तर ICSE निकाल ९९.७६ टक्के लागला आहे. ICSE च्या निकालात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ९९.९८ टक्के लागली असल्याचं सांगितले आहे. तर, ISC चा म्हणजेच बारावीच्या निकाला मध्ये मुलांचा निकाल ९९.८६ टक्के लागला आहे. तर यात विद्यार्थिनींचा निकाल ९९.८६ टक्के लागला आहे.

विद्यार्थ्यांना cisce.org आणि result.cisce.org या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. यासह एसएमएसच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना रिझल्ट पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना यूनिक आयडी नंबर 09248082883 वर पाठवावा 'ICSE/ISC (Unique ID) लागेल. यंदा कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बोर्डाने ISCE आणि ISC च्या दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. पहिल्यांदाच परीक्षा न घेता दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे. अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या निकाल लागणार आहे.

असा पाहा निकाल...

१. विद्यार्थ्यांनी cisce.org किंवा result.cisce.org या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या

२. संकेतस्थळावर RESULT च्या लिंकवर क्लिक करा.

३. त्यानंतर रोल नंबर आणि अन्य माहिती भरा.

४. माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT