Marriage Bureau Saam tv
देश विदेश

Marriage : लग्नानंतर पहिल्यांदाच नवऱ्याने नवरीचा पाहिला चेहला, अन् म्हणाला 'मी आत्महत्या करेन...'

सासरच्या घरी तोंड दाखण्याच्या विधीदरम्यान वधूचा पदर उचलण्यात आला आणि एकच खळबळ उडाली.

साम टिव्ही ब्युरो

लखनौ : लग्नानंतर नवरदेवाने नवरीचा चेहरा पाहिला अन् थेट आत्महत्येची धमकी दिली. उत्तर प्रदेशातील सम्भल जिल्ह्यात फसवणुकीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या बाजूने लहान मुलीऐवजी मोठ्या मुलीशी लग्न केल्याचा आरोप वर पक्षाने केलाआहे.

सासरच्या घरी तोंड दाखण्याच्या विधीदरम्यान वधूचा पदर उचलण्यात आला आणि एकच खळबळ उडाली. संतापलेल्या मुलाने ताबडतोब वधूला तिच्या माहेरच्या घरी पाठवले. आता न्याय न मिळाल्यास आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याची धमकी नवऱ्या मुलाने दिली आहे. जिल्ह्यातील हजरत नगर गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटौली गावातील हे प्रकरण आहे.

दालचंदचा विवाह कैलादेवी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत २६ जानेवारी रोजी झाला होता. प्रथेमुळे वधूचा चेहरा झाकलेला होते. पारंपरिक विधींसह लग्न केले. त्यानंतर लग्नघरात नवीन सून आल्यानंतर तिचा मुंह दिखाईचा सोहळा सुरू झाला. यावेळी वराच्या बाजूच्या महिलांनी सुनेच्या डोक्यावरून पदर उचलला तेव्हा घरात उपस्थित लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली.

मुलाचं लग्न लहान मुलीशी ठरलेलं असताना वधूच्या लोकांनी मोठ्या मुलीशी लग्न लावून दिले होते. लवकरच ही गोष्ट गावभर पसरली आणि सासरच्या मंडळींनी नववधूला तिच्या माहेरी पाठवले. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वादावादी आणि पंचायती सुरू झाल्या.

26 जानेवारीपासून आतापर्यंत या प्रकरणी त्यांच्याच समाजातील लोकांमध्ये पंचायती झाल्या, मात्र आजतागायत या समस्येवर कोणताही तोडगा निघालेला नाही. मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेल अशी धमकी नवरा मुलाने दिली आहे. मुलाच्या बाजूने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Live News Update: शिवसेना उबाठाचे गोकुळ दूध संघावर भ्रष्टाचाराचे आरोप

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

पोलीस कॉन्स्टबलचा रस्ते अपघातात मृत्यू, बातमी कळताच पत्नीला मोठा धक्का, निराशेतून धक्कादायक पाऊल

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कपच्या प्राइज मनीपेक्षा ८ पट जास्त; किंमत ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT