नवरा-बायकोचा वाद; पेट्रोल ओतून ४ वर्षाच्या मुलाला जिवंत जाळले! Saam Tv
देश विदेश

नवरा-बायकोचा वाद; पेट्रोल ओतून ४ वर्षाच्या मुलाला जिवंत जाळले!

दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी कुटुंबीयांनी अनेकवेळा प्रयत्न केले, मात्र काही उपयोग झाला नाही, या घटनेवर पोलिसांनी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे सांगितले आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

चंदीगड : गुरुग्राममधील पतौडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोचा वाद सुरु असताना पेट्रोल ओतून एका 4 वर्षाच्या निष्पाप मुलाला जिवंत जाळण्यात आलंय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तीन वर्षांपूर्वी पतौडीच्या सुमनचा विवाह रोहतकच्या रिंकूसोबत झाला होता. दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता आणि आरोपीची पत्नी तिच्या भावाच्या घरी राहत होती. रोहतकचा रहिवासी असलेला रिंकू आपल्या बायकोला भेटण्यासाठी तिच्या माहेरी आला होता.

हे देखील पहा :

रिंकू बायकोला भेटायला पुन्हा तिच्या भावाच्या घरी गेला. याहीवेळी रिंकूचा बायकोशी झगडा झाला, पुन्हा बाचाबाची झाली आणि रिंकूने रागाच्या भरात बायकोच्या भावाच्या मुलाला व मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करून आरोपी फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीररित्या भाजलेल्या मुलांना रुग्णालयात दाखल केले. उपचारावेळी दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात यातील चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी रिंकूचा शोध सुरू केला आहे. लवकरच आरोपींला अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी कुटुंबीयांनी अनेकवेळा प्रयत्न केले, मात्र काही उपयोग झाला नाही, या घटनेवर पोलिसांनी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे सांगितले आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. लवकरच आरोपीची तुरुंगात रवानगी होईल, असा दावा पोलिस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

SCROLL FOR NEXT