वृत्तसंस्था: राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वाराच्या श्रीनाथ कॉलनीत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेने काल संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती सासरच्या मंडळींना मिळताच पोलिसांना (Police) माहिती देण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
हे देखील पाहा-
मिळालेल्या माहितीनुसार, देवणा येथील रहिवासी नारायण उर्फ प्रवीण सुथार यांची पत्नी प्रेमलता (वय- 32) हिने श्रीनाथ कॉलनीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (self-slaughter) केली आहे. यादरम्यान मुले बाहेर खेळत होती, विवाहितेचा नवरा केरळ (kerala) येथे ज्वेलरीचे काम करतो तर सासू गावात राहत असते. सायंकाळी उशिरापर्यंत प्रेमलता यांच्या खोलीचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी नातेवाइकांना आणि पोलिसांना कळवले होते.
दरवाजा तोडल्यानंतर प्रेमलता यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला साहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून सायंकाळी नाथद्वारा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला आहे. आज सकाळी मेडिकलमधून शवविच्छेदन करून मृतदेह सासरच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी (police) मृताच्या बाजूने दिलेल्या अहवालावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्या असल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.