पतीने पत्नीची फावड्याने केली हत्या; कारण ऐकून पोलिसही हैराण Saam Tv
देश विदेश

पतीने पत्नीची फावड्याने केली हत्या; कारण ऐकून पोलिसही हैराण

मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील हिरापूर येथे ही घटना घडली आहे.

वृत्तसंस्था

बालाघाट : आंघोळ करताना पत्नीने टॉवेल द्यायला उशिर केला. एवढ्या क्षुल्लक कारणाने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील हिरापूर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार बहे (वय 50) असे आरोपीचे नाव आहे. सकाळी आंघोळ झाल्यावर त्याने आपल्या पत्नीला टॉवेल मागितला, मात्र, त्याची भांडी घासत होती त्यामुळे ती थोडावेळ थांबा, असं म्हणाली. त्यामुळे त्याला भयानक राग आला. आणि संतापामुळे, त्याने फावड्याने तिच्या डोक्यावर चार ते पाच वार केले.

त्यांची 23 वर्षीय मुलगी वाद थांबविण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तिला देखील धमकी देत दिली आणि बाजूला केले. त्यानंतर परत त्याने वार केले आणि यामुळे जागीच ठार झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात किरणापूर पोलिस ठाण्यात Kiranpur Police Station तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आणि त्यानंतर कुटुंबीयांना मृतदेह सोपविण्यात आला.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT