Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पतीची जबरदस्ती! अश्लिल Video शूट करुन ब्लॅकमेल

देशाच्या विविध भागातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत

Shivani Tichkule

Bengaluru Crime News : देशात महिलांवरील अत्याचार काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीत. देशाच्या विविध भागातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्याच आता बंगळुरू येथून एक संतापजनक घटना समोर आले आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेने तिच्या पतीविरोधात धक्कादायक आरोप केले आहेत. पतीने त्याच्या मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी आपल्याला भाग पाडल्याचं या महिलेने म्हटलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आपल्या मित्रांबरोबर पत्नीला शरीरसंबंध ठेवण्याची बळजबरी केल्यानंतर त्यांचे व्हिडीओ काढून त्या आधारे या आरोपीने पत्नीला ब्लॅकमेल केल्याचा आरोपही या महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटल आहे. महिलेच्या तक्रारीनंतर तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिलेने पोलिसांना (Police) सांगितले की, तिच्या पतीने इतर पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिच्यावर अत्याचार केला. मारहाण केल्यानंतर पतीने तिला दोन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवायला लावले आणि नंतर मोबाईलने तिचा व्हिडिओ बनवला. तसेच घटस्फोट मागितला तर व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) अपलोड करण्याची धमकी दिली.

2011 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते आणि दोघांना एक मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. सम्पीगेहल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार आरोपीला दारू आणि अंमली पदार्थांचं व्यसन आहे. त्याने महिलेच्या बहिणीला त्रास दिल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला आहे. आपल्याबरोबर शरीरसंबंध ठेवावेत यासाठी या व्यक्तीने मेहुणीला ब्लॅकमेल करुन तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवले होते, असा आरोपही या पत्नीने केला आहे.

महिलेचा आरोप आहे की तिचा पती दारूच्या नशेत तिला मारहाण करत असे. परिस्थिती बिकट झाल्यावर त्याने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. याचा राग आल्याने पतीने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत आपल्यला ​ब्लॅकमेल केल्याचे देखील या महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT