High Court Decision Saam TV
देश विदेश

पत्नीची इतर महिलांशी तुलना करणं ही क्रूरता : हायकोर्ट

कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीची इतर महिलांशी तुलना करणं, टोमणे मारणे बंद करायला हवं अन्यथा कायद्याने त्यांना ते महागात पडू शकतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पतीने पत्नीला सतत टोमणे मारणं, स्वत:च्या पत्नीची तुलणा इतर महिलांशी करणं हे मानसिक छळाचं क्रूर कृत्य असल्याचं मत केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) नोंदवलं आहे. त्यामुळे आता आपल्या पत्नीला दिसण्यावरुन, तिच्या स्वभावावरुन टोमणे मारण्याची आणि तिची तुलना इतर महिलांशी करणं, महागात पडू शकतं.

न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि सुधा यांच्या खंडपीठाने पतीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरिक्षण नोंदवले आहे. याबाबत निर्णय देताना कोर्टाने सांगितलं की, जर पतीने पत्नीकडून अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत म्हणून जर सतत पत्नीला काही टोमणे मारले वा तिची तुलना इतर महिलांशी केली. तर ती मानसिक क्रूरता असेल, शिवाय इतर महिलांसारखी अपेक्षा आपल्या पत्नीकडून केली जाऊ शकत नाही असंही न्यालयाने म्हटलं आहे.

या प्रकरणातील पत्नीने असा आरोप केला होता की, भावांच्या पत्नी असो किंवा दिसण्याचा विषय असो, तू कधीच माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही, असं तिचा पती सतत म्हणायचा. तर इतर महिलांची तुलना करताना आपल्याला वारंवार हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप याचिकाकर्त्या महिलेने पतीवर केला होता.

महिलेच्या याच याचिकेवरती निर्णय देताना आता न्यायालयाने (Court) महत्वपुर्ण निरिक्षण केलं असून आपल्या पत्नीची तुलणा इतरांशी न करण्याबाबतचा सल्ला देखील दिला आहे. त्यामुळे कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीची इतर महिलांशी तुलना करणं, टोमणे मारणे बंद करायला हवं अन्यथा कायद्याने त्यांना ते महागात पडू शकतं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

SCROLL FOR NEXT