Ayodhya Ram Mandir Darshan Latest News  Saam TV
देश विदेश

Ram Mandir Darshan: जय श्रीरामच्या घोषणांनी अयोध्या दुमदुमली, दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी; पाहा VIDEO

Ayodhya Ram Mandir Darshan: पहिल्याच दिवशी प्रभू श्रीरामाचं मुख दर्शन व्हावं, यासाठी मंगळवारी पहाटे ३ वाजेपासून भाविकांनी अयोध्येत तुफान गर्दी केली आहे.

Satish Daud

Ayodhya Ram Mandir Darshan Latest News

अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) मोठ्या थाटामाटात पार पडला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर राम मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. रामलल्लाचं पहिलंच मुखदर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पहिल्याच दिवशी प्रभू श्रीरामाचं मुख दर्शन व्हावं, यासाठी मंगळवारी पहाटे ३ वाजेपासून भाविकांनी अयोध्येत तुफान गर्दी केली आहे. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Latest Marathi News)

रामभक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता, अयोध्येत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आजपासून राम मंदिर (Ram Mandir) भक्तांसाठी खुले करण्यात आलं आहे. गाभाऱ्यात विराजमान झालेल्या मूर्तीसह नवीन मूर्तीचे दर्शन भाविकांना करता येणार आहे.

त्यानुसार, मंगळवारी पहाटे ७ वाजेपासून दर्शनाला सुरुवात झाली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पहिल्या सत्रामध्ये दर्शन घेता येणार आहे.यानंतर पूजेसाठी दीड तासांसाठी मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद ठेवण्यात येणार आहे. या वेळेत कुठल्याही भाविकाला मंदिरात प्रवेश नसणार आहे.

त्यानंतर दुपारी २ वाजेपासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत अशा दुसऱ्या सत्राचं दर्शन सुरू होणार आहे. भाविकांची गर्दी वाढल्यास दर्शनाचा कालावधी वाढणार आहे. दरम्यान, सोमवारीही सर्वसामान्य भाविकांना रामललाचे दर्शन घेता आले नाही.

अभिषेक सोहळ्यानंतर केवळ विशेष पाहुण्यांनाच दर्शन देण्यात आले होते. रामललाच्या पुजाऱ्यांचे प्रशिक्षक आचार्य मिथिलेशनंदिनी शरण यांच्या माहितीनुसार, आता रामललाची अष्टम सेवा २४ तासांत ८ वेळेस केली जाणार आहे. याशिवाय ६ वेळा आरती देखील केली जाणार आहे. आरतीला उपस्थित राहण्यासाठी पास दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT