Passengers jump off moving Howrah-New Delhi superfast train after fire breaks out in coach near Jamtara saam tv
देश विदेश

मोठी बातमी! हावड़ा-नवी दिल्ली मार्गावर सुपरफास्ट ट्रेनमध्ये लागली आग; धावत्या रेल्वेतून प्रवाशांच्या उड्या

Fire Erupts In Superfast Train: झारखंडमधील जामतारा जिल्ह्यात सोमवारी एक मोठी दुर्घटना टळलीय. हावडा-नवी दिल्ली मार्गावर टाटा १८१८४ सुपरफास्ट ट्रेनच्या एका डब्याला अचानक आग लागली.

Bharat Jadhav

हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावर टाटा १८१८४ सुपरफास्ट ट्रेनच्या एका बोगीला अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती होताच प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. ही घटना जामतारा जिल्ह्यातील कालाझारिया रेल्वे ट्रॅकजवळ ही घटना घडलीय. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, डब्यातून अचानक धूर आणि ज्वाला येऊ लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीती पसरली. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारण्यास सुरुवात केली.

दरम्यान प्रसंगावधान राखत लोको पायलटने ताबडतोब ट्रेन थांबवली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. ट्रेन सुमारे ४५ मिनिटे थांबली, त्या दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राने आग शमवली. दरम्यान घटनेवेळी उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कोचच्या अंडर-गियरमधून निघणाऱ्या ठिणग्यांमुळे आग लागली. ते पाहून प्रवासी घाबरले आणि त्यांनी कोचमधून उड्या मारण्यास सुरुवात केली..

जामतारा स्टेशनवर आगमन होताच ट्रेनची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेची सविस्तर चौकशी सुरू आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त दक्षता घेतली जाईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT