Ayodhya Ram Mandir  Saam Tv
देश विदेश

Ram Mandir Darshan Time Table: तुम्हालाही रामलल्लाचं दर्शन करायचं आहे? जाणून घ्या दर्शन आणि आरतीच्या वेळा काय?

Ram Mandir Darshan Time Table: राम मंदिराच्या विशेष सोहळ्यासाठी देशभरातील प्रतिष्ठित लोकांनी हजेरी लावली. उद्या मंगळवारपासून सर्वांसाठी मंदिर खुले होणार असल्याने मंदिरस्थळी एकच गर्दी होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

Ayodhya Ram Mandir Darshan Time Table:

अयोध्येत आज राम मंदिराचं लोकार्पण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत राम मंदिरात राममूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आज सोमवारी २२ जानेवारीला सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणार नाही. मात्र, २३ जानेवारीपासून अयोध्येतील राम मंदिर सर्वांसाठी खुलं होणार आहे. या विशेष सोहळ्यासाठी देशभरातील प्रतिष्ठित लोकांनी हजेरी लावली. उद्या मंगळवारपासून सर्वांसाठी मंदिर खुले होणार असल्याने मंदिरस्थळी एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

काय असणार दर्शनाची वेळ?

अयोध्येत २३ जानेवारीपासून सकाळी सात ते ११.३० वाजेपर्यंत दर्शन करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन करण्याची संधी मिळणार आहे. मंदिरात दिवासाला दोन वेळा आरती केली जाणार आहे. या राम मंदिरात सकाळी ६.३० वाजता श्रृंगार आरती होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता आरती होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरती करण्यासाठी लागेल विशेष पास

मंदिराच्या आरतीत सामील होण्यासाठी विशेष पास लागणार आहे. आरतीत सामील होण्याचा पास हा मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे. मंदिरात सामान्य मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी कोणत्याही पासची गरज नाही.

आरतीच्या पाससाठी तुम्हाला वेबसाइटवर मोबाइल क्रमांक नोंद करावा लागेल. तुम्ही मोबाईल क्रमांक नोंद केल्यानंतर ओटीपी येईल. त्यानंतर तुम्ही योग्य ती माहिती दिल्यानंतर पास डाउनलोड करू शकता.

तुम्हाला आरतीसाठी विशेष पास हा ऑफलाइन पद्धतीने मिळू शकतो. तसेच अधिकृत ओळखपत्राची गरज भासेल. एका आरतीत केवळ ३० जण उपस्थितीत राहू शकतात. जे आरतीच्या पाससाठी प्रथम अर्ज करतील, त्यांनाच आरतीत सहभागी होता येईल. आरतीसाठी पास मिळाल्यानंतर अर्धा तास आधी मंदिरात उपस्थित राहावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT