snake fight Saam Tv
देश विदेश

VIDEO: सापाचा पिल्लांवर हल्ला, कोंबडीतली आई झाली जागी; कोब्राचा बिघडवला थोबडा

कोब्रा सापाने कोंबडीच्या पिल्लांवर हल्ला केल्यानंतर संतापलेल्या आईने सापाला चांगलाचा धडा शिकवला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video : मानव असो वा प्राणी आई ही आई असते. आपल्या मुलांवरील संकट आलं की ती कोणतीही पर्वा न करतो समोरच्याशी भिडते. एका व्हायरल व्हिडीओमध्ये अशीच आई दिसली आहे. आपल्या पिल्लांचा बचाव करण्यासाठी सापासारख्या विषारी प्राण्यासमोर कोंबडी उभी राहिली. नुसती उभी राहिली नाही तर सापाला (Snake) आपल्या पिल्लांच्या जवळपासही फिरकू दिलं नाही.

ट्विटरवर @ViralPosts5 या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये कोब्रा साप आणि कोंबडी एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. कोब्रा सापाने कोंबडीच्या पिल्लांवर हल्ला केल्यानंतर संतापलेल्या आईने सापाला चांगलाचा धडा शिकवला. सापाशी भिडताना कोंबडी कुठेही मागे हटताना दिसत नाही. (Maharashtra News)

व्हायरल व्हिडीओमध्ये एक कोंबडी कोब्रावर रागाने हल्ला करताना दिसत आहे. सापासारख्या चपळ प्राण्याला देखील कोंबडीने सळो की पळो केलं. अखेर कोणताही पर्यान उरल्याने जीव वाचवण्यासाठी सापाने तिथून पळ काढला.

ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला ते आईची मुलांप्रती असलेली माया आणि शक्ती पाहून चकित झाले आहेत. मुलांचा त्रास आईला अजिबात सहन होत नाही. मुलांच्या सुखासाठी ती काही करायला तयार असते हेच या व्हिडीओतून दिसत आहे.

या व्हिडीओला 16 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर जवळपास 62 हजार यूजर्सनी व्हिडीओला लाईक केलं आहे. आईशी पंगा घ्यायचा नाही असं म्हणत अनेकांना व्हिडीयोवर कमेंट केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: पुणे विद्यापीठ कुलसचिवांच्या कार्यालयाच्या बाहेर अभाविप आक्रमक

SCROLL FOR NEXT