Canteen Viral Video Saam TV
देश विदेश

Hospital Canteen Viral Video : पायात बूट घालून धुतले बटाटे; रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील किळसवाना व्हिडिओ व्हायरल

Canteen Potato Video : हॉस्पिटल स्वत:च रुग्णांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video : प्रत्येक व्यक्ती आजारी पडल्यानंतर ठिक होण्यासाठी उपचार करून घेण्यासाठी रुग्णालयात जात असतो. रुग्णालयामध्ये आपल्या जीवाला कसलाही धोका नाही असं प्रत्येकाला वाटतं. मात्र एक हॉस्पिटल स्वत:च रुग्णांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्याच्या पायांनी भाजीसाठी वापरले जाणारे बटाटे धुवत आहे. या किळसवाण्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती हॉस्पीटलच्या कॅन्टीनमध्ये आहे. इथे त्याला बटाट्याची भाजी बनवायची असल्याने तो एका मोठ्या टोपात बटाटे टाकून घेतो.

त्यानंतर तो हे बटाटे पायाने चोळून धुताना दिसत आहे. रायबरेली येथील एम्स या रुग्णालयातील हा व्हिडिओ असल्याचं समजलं आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर एम्स रुग्णालयातील प्रशासनाने यावर उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. तसेच या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे.

रुग्णालयातील (Hospital) हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मीडिया पीआर प्रभारी डॉ. शुक्ला यांनी म्हटले आहे की,सदर व्हिडिओ हा १५ ते २० दिवसांपूर्वीचा आहे. सदर कर्मचाऱ्याला १५ दिवसांआधीच काढून टाकण्यात आले आहे. या वेळी कॅन्टीनमधील या व्यक्तीने केलेल्या किळसवाण्या कृत्यावर अधिक बोलणे टाळले.

सर्व रुग्णालयात एकच परिस्थिती

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या विविध प्रतिक्रीया दिल्या आहेत. यात काही यूजर्सने म्हटलं आहे की, रुग्णालयात आल्यावर औषध उपचार सुरू असूनही रुग्णाला अगदी फ्रेश वाटत नाही. कदाचीत सगळीकडे अशाच पद्धतीने जेवण बनवले जात असेल. त्यामुळे रुग्णालयातील जेवण नेहमी बेचव लागते. व्हिडिओ पाहून नेटकरी यावर आपल्या वेगवेगळ्या संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT