HMPV Virus Spread Saam Tv
देश विदेश

HMPV Outbreak Updates: HMPV च्या संसर्गात ४६ टक्क्यांनी वाढ; भारतासह कोणकोणत्या देशात पसरतोय HMPV व्हायरस?

HMPV Virus Spread : इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्येही एचएमपीव्हीची प्रकरणे आढळू लागली आहेत. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे.

Bharat Jadhav

चीनच्या वुहान शहरापासून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील देशांना हैरान करून सोडलं होतं. आता पाच वर्षानंतर पुन्हा एकदा चीनमधील एका व्हायरसने जगाची चिंता वाढवलीय. चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसचे प्रकरणात वाढ होऊ लागलीय. या व्हायरसची प्रकरणे शेजारील देशातही आढळत आहेत. मलेशिया, हॉगकॉग आणि जपानमध्येही हा व्हायरस पसरू लागलाय. या देशातील संसर्ग होण्याचे आकडे चिंता वाढवणारे आहेत. मलेशिया आणि हॉगकॉगमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण ४६ टक्के आहे.

आत्तापर्यंत भारतात HMPV चे ७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन आणि गुजरातमध्ये एक रुग्ण आढळून आलाय. त्यापैकी काहींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून काहींची प्रकृती सुधारत आहे. यासह इंडोनिशिया आणि व्हिएतनाममध्येही HMPVची प्रकरणं मिळून येत आहेत. यामुळे जगातील इतर देशांची चिंता वाढली असून कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होणार की अशी भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील नागपूरमध्येही २ रुग्ण आढळले आहेत. या नव्या व्हायरसने अनेकांना कोरोना काळाची आठवण झाली. नव्या विषाणूबरोबर लॉकडाऊनची देखील चर्चा सोशल मीडियावर सुरू झालीय. मात्र कोरोनाप्रमाणे राज्यात लॉकडाऊन लागणार नसल्याची माहिती हाती आलीय.

दरम्यान मलेशियातील वाढते प्रकरणे पाहून तेथील नव्याने मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. मलिशियाई सरकारने आपल्या नागरिकांना कोविड सारखा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितलंय. संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. साबणाने परत-परत हात धुवावीत. यासह तोंडावर मास्क लावावीत. तसेच गर्दी करून, नये असा सुचना सरकारकडून देण्यात आली आहे.

अनेक वृत्तानुसार, चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहे. HMPV संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. परंतु चिनी अधिकारी किंवा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अद्याप याची पुष्टी केलेली नाहीये. HMPV मुळे फ्लू सारखी लक्षणे ओळखली जातात आणि त्यामुळे COVID-19 सारखी लक्षणे देखील होऊ शकतात, म्हणूनच आरोग्य अधिकारी परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करताहेत. काही सोशल मीडिया वृत्तानुसार, स्थिती गंभीर आहे, परंतु चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने संसर्गाचे प्रमाण हे हिवाळ्यामुळे वाढल्याचं म्हटलंय. तसेच पर्यटकांनी चिंता करू नये, सुरक्षित प्रवास करावा असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

SCROLL FOR NEXT