Thalapathy Vijay takes oath as Tamil Nadu Chief Minister while his emotional father watches from the audience saam tv
देश विदेश

Vijay thalapathy: सुपरस्टार ते मुख्यमंत्री! थलापती विजय यांनी घेतली शपथ; वडिलांना अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडिओ

Vijay’s Father Gets Emotional at Swearing-In Ceremony: तमिळनाडूमध्ये थलापती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडला. सीएम पदाची शपथ घेताना विजय यांचे वडील रडू लागले.

Bharat Jadhav

  • थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

  • चेन्नईच्या नेहरू स्टेडियममध्ये भव्य शपथविधी सोहळा पार पडला

  • विजय यांच्या वडिलांचा भावनिक क्षण चर्चेचा विषय ठरला.

तमिळनाडूच्या राजकारणात आज इतिहास नोंदवला गेला. गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता स्थापनेचा गोंधळ शनिवारी मिटला. टीव्हीके पक्षाचे संस्थापक विजय थलपती यांच्या पक्षाचे सरकार स्थापन केलं. आज रविवारी सकाळी सीएम पदाची शपथ घेतली. १० मे, २०२६ हा दिवसाची इतिहासात नोंद झाली.

चित्रपट अभिनेते-राजकारणी थलपथी विजय यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी शपथ घेतली. पण या भव्य सोहळ्यादरम्यान एक भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.

विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेले त्यांचे वडील, एस. ए. चंद्रशेखर टाळ्या वाजवत असताना रडू लागले. त्यांच्या डोळ्यांत आनंदअश्रू आले. आपल्या मुलाचे यश पाहून वडिलांच्या डोळे पाणावले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

शपथविधी सोहळ्यात काय घडले?

चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यात अनेक प्रमुख राजकीय व्यक्ती उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हेही मंचावर होते. तर भाजप आणि इतर पक्षांचे नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

विजयाची ही शपथ तामिळनाडूच्या राजकारणातील एका नव्या पर्वाची सुरुवात मानली जातेय. अभिनेते विजय यांनी सीएम पदाची शपथ घेणार असल्याने समर्थक प्रचंड उत्साही होते. शपथ घेतल्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला.

विजयचे वडील का रडले?

शपथविधी सोहळ्यातील सर्वात भावनिक क्षण देखील पाहायला मिळाला. हा क्षण होता, विजय यांचे वडील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर टाळ्या वाजताना रडू लागले होते. आपल्या मुलाला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून स्वतःला आवरू शकले नाहीत. मुलगा सीएम बनल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

सुरुवातीला ते अभिमानाने टाळ्या वाजवत असल्याचे दिसत होते, पण काही क्षणांतच त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. हाच क्षण कॅमेऱ्याने नेमका टिपला. जवळच बसलेल्या विजयच्या आई, शोभा चंद्रशेखर यादेखील अत्यंत भावुक झाल्याचं दिसल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, इंजिनिअर्सच्या मागण्या पूर्ण होणार? वाचा सविस्तर...

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: करमाळ्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळला.

साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT