Rashid Miyan Makbra Or Shivmandir Saam Digita
देश विदेश

Court News: रशीद मियाँ मकबरा की शिवमंदिर? फारुखाबाद न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व्हे, हिंदू पक्षाने केला हा दावा?

Rashid Miyan Makbra Survey: उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्येही ज्ञानवापीसारखंच प्रकरण समोर आलं आहे. कायमगंज तहसीलच्या मौ रशिदाबाद येथे असलेल्या रशीद मियाँ यांचा शेकडो वर्षे जुना मकबरा शिवमंदिर असल्याचा दावा करत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

Rashid Miyan Makbra Or Shivmandir

उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्येही ज्ञानवापीसारखंच प्रकरण समोर आलं आहे. कायमगंज तहसीलच्या मौ रशिदाबाद येथे असलेल्या रशीद मियाँ यांचा शेकडो वर्षे जुना मकबरा शिवमंदिर असल्याचा दावा करत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. मकबरा पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून काल या मकबचा सर्व्हे करण्यात आला असून अमीन आता या संदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करणार आहेत.

फर्रुखाबादच्या कायमगंज शहरातील रहिवासी हिंदू जागरण मंचचे कार्यकर्ते प्रदीप सक्सेना यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि पुरातत्व विभागाला नोटीस देऊन मौ रशिदाबाद गावात असलेला मकबरा शिवमंदिर असल्याचा दावा करत मकबऱ्याचा सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच हे शिवमंदिर होते जे मुघल आक्रमकांनी उद्ध्वस्त करून मकबऱ्यात रूपांतरित केल्याचा दावा केला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय, हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्याने फतेहगढ न्यायालयात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग (क्रमांक 454) 2023 प्रदीप सक्सेना विरुद्ध जिल्हाधिकारी फर्रुखाबाद हा खटला दाखल केला होता. ज्यामध्ये या ठिकाणी पूजा आणि इतर सनातन धार्मिक कार्य करण्यास कोणत्याही प्रकारची बंधने आणू नयेत, अशी मागणी करण्यात आली होती. खटला स्वीकारताना न्यायालयाने मकबऱ्याच्या आमेन सर्व्हेचा अहवाल मागवला आहे. अमीनद्वारा काल मकबऱ्याचा सर्व्हे करण्यात आला असून याचा अहवाल जमीन न्यायालयात सादर केला जाणार आहे.

फिर्यादी प्रदीप सक्सेना यांचा दावा आहे की मौ रशिदाबाद गावात असलेला मकबरा प्राचीन काळातील गंगेश्वर नाथ शिव मंदिर होते. जे 1607 मध्ये मुघल शासकांनी पाडले आणि या ठिकाणी नवाब रशीद खान (रशीद मियाँ) यांची कबर बांधण्यात आली होती, ज्याला आज रशीद खान मकबरा म्हटलं जातं. सध्या हा मकबरा पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. मंदिराची मूळ रचना बदलली नाही, मंदिरात ज्या ठिकाणी शिवलिंग होते त्याच ठिकाणी मकबरा बाधण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT