Himachal Landslide काळाचा घाला! दरड कोसळल्याने टॅक्सीचा चक्काचूर; ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू  meta ai
देश विदेश

Himachal Pradesh Landslide : काळाचा घाला! टॅक्सीवर दरड कोसळली; ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू

लाहौल-स्पीतीतील काडू नाला घाटरस्त्यावर अचानक दरड कोसळून त्याखाली टॅक्सीचा चक्काचूर झाला. या भीषण दुर्घटनेत ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू झाला, तर दोघांना वाचवण्यात यश आले.

Saam Tv

हिमाचल प्रदेशात शुक्रवारी सकाळी दरड कोसळून भीषण अपघात घडला. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली टॅक्सी दबली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. यात एका सहा महिन्याच्या बाळाचा देखील मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी तात्काळ मदतकार्य राबवण्यात आले. यात २ प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यातील उदयपूर येथून १५ जणांना घेऊन टॅक्सी पांगी येथे जात असताना वाटेतच काळाने घाला घातला. वाहन काडू नाला या घाटरस्त्यातून जात असताना त्यावर अचानक दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात एका सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. दरड कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडत असल्याने वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली होती.

दोघांना वाचवण्यात यश

घटनेनंतर पोलीस प्रशासन, स्थानिक आणि बचाव पथकाच्या मदतीने घटनास्थळी तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. दरडीच्या ढिगाऱ्याखालून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ते जखमी झाले होते. त्यांना तत्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला. काही काळ या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली आहे.

अपघातग्रस्त वाहनातील १५ जणांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन प्रवासी सुरक्षित आहेत. तसेच अपघातग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन भरमौरचे आमदार जनक राज यांनी दिले आहे.दरम्यान, हिमाचल प्रदेशात भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. आतापर्यंत अनेक जणांचे बळी अशा दुर्घटनांमध्ये गेले आहेत. या घटनेच्या काही तासांपूर्वीच सिम्मा येथे डोंगरावरील भलामोठा दगड कोसळून त्यात महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच तिचे कुटुंबीय देखील यात जखमी झाले होते.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT