Himachal Pradesh Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking: संतापजनक! घरी कुणी नसल्याचा फायदा घेतला, नातवाने आजीची अब्रू लुटली; आरोपी २ मुलांचा बाप

Grandmother physically Assaulted by Grandson: शिमला जिल्ह्यात नातवाकडून आजीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, सखोल तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

माणुसकीला काळिमा फासणारी घटना हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रोहरू चिडगाव पोलीस स्टेशन परिसरातून उघडकीस आली आहे. एका वृद्ध महिलेवर तिच्याच नातवाने बलात्कार केला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा सध्या सखोल तपास सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा गुन्हा करणारा आरोपी विवाहित असून, दोन मुलांचे वडील आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी या गुन्ह्याची तक्रार प्राप्त झाली. चिडगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष कुमार (वय वर्ष २५) असे आरोपीचे असून, आरोपी चिडगावातील रहिवासी आहे. मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडितेनं तक्रारीत म्हटलं की, पतीच्या निधनानंतर पीडित महिला तिच्या घरात एकटी राहायची. ३ जुलैला दुपारी आरोपी नातू घरात घुसला. नंतर तिच्यावर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केला. उघड केल्यास आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित महिलेनं चिडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. तसेच आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT