Aryan Khan | Sameer Wankhede  SaamTvNews
देश विदेश

वानखडे यांना धक्का; आर्यन खान प्रकरणात NCB च्या तपासावर हायकोर्टाचे प्रश्नचिन्ह!

आर्यनच्या चॅटमध्ये अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा यांच्यात पार्टीत अंमली पदार्था नेण्यासंदर्भात कोणतेही चर्चा आढळून आली नसल्याचे हायकोर्टाने आदेशात म्हटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर NCB कडून कारवाई करण्यात आली होती. याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यास जवळपास महिनाभर कोठडीत राहावे लागले होते. हाय प्रोफाईल अश्या या प्रकरणावरून राज्यात मोठे राजकारण तापले ज्याची धग अजूनही जाणवतच आहे.

हे देखील पहा :

याच प्रकरणात आता हायकोर्टाकडून NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जोरदार दणका मिळाला आहे. ज्या चॅट च्या आधारावर आर्यन खान सह इतरांवर कारवाई करण्यात आली होती त्या आर्यनच्या चॅटमध्ये अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा यांच्यात पार्टीत अंमली पदार्था नेण्यासंदर्भात कोणतेही चर्चा आढळून आली नसल्याचे हायकोर्टाने आदेशात म्हटले आहे.

NCB आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या कथित कबुली जबाबावर विसंबून राहू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, अशी विधाने पुराव्यात अमान्य असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

NCB ने या तीनही जणांवर कट रचल्याचे कलम लावले होते. मात्र, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे करण्याचा कट रचल्याचा कोणताही सकारात्मक पुरावा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे व त्यांना जामीन मंजूर करण्याचे कारण सांगितले आहे.

तसेच आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही, जेणेकरुन संबंधित वेळी त्यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते की नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने जामीन आदेशात नोंदवले आहे. या तिघांविरोधात एनसीबीकडे ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT