Hemant Soren Saam Digital
देश विदेश

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका होणार का? सुप्रीम कोर्ट अंतरिम जामिनावर काय म्हणालं?

Supreme Court : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. मात्र सोरेन याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्यावर आता २१ मेला सुनावणी होणार आहे.

Sandeep Gawade

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. मात्र सोरेन याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्यावर आता २१ मेला सुनावणी होणार आहे. हेमंत सोरेन यांना निवडणुकीच्या खूप आधी अटक करण्यात आली होती, त्यामुळे केवळ प्रचारासाठी त्यांना जामीन हवा असल्याचा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला होता. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. त्याविरोधात त्यांनी झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळली होती. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शुक्रवारी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल असं वाटत होतं, मात्र सुप्रीम कोर्टानेही त्यांना दिलासा दिला नाही.

हेमंत सोरेन यांच्यावर ३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची ८.८६ एकर जमीन बेकायदेशीरपणे संपादित केल्याचा आरोप आहे. आच आरोपातून ईडीने ३१ जानेवारी रोजी त्यांना अटक केली होती. दरम्यान केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांच्या सुटकेविषयी चर्चा सुरू आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, आता २१ मे कडे लक्ष लागलं आहे.

सोरेन यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी कोर्टात बाजू मांडली. निवडणुकीसाठी हेमंत सोरेन यांना तुरुंगातून बाहेर यावं लागेल. पुढील तारीख 20 मे आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विचारले की, जमीन तुमच्या ताब्यात आहे का? सिब्बल म्हणाले, नाही. यात आणखी कोणाचाही सहभाग आहे का? या प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावा आहे का? असे प्रश्न न्यायालयाने यावेळी केले. हेमंत सोरेन यांचा अतिरिम जामीन मंजूर झालेला नसल्याचं न्यालायाने यावेळी सांगितलं. ईडीच्या वतीने एस.व्ही. राजू यांनी, तयारीसाठी वेळ हवा असल्यांच सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंधन दरवाढीने पालकांचं बजेट कोलमडणार; स्कूल बसच्या भाड्यात मोठी वाढ

पोलिसांनी जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भावाला जेलमध्ये डांबलं, नंतर तरुणी घरी परताच प्रशासन हादरलं

Maharashtra News Live Update: बकरी ईदच्या दिवशी पुसद ग्रामीण पोलिसांची अवैध शस्त्राविरोधात कारवाई

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाच्या गळ्यात रश्मिकाच्या नावाचे पेंडन्ट; चाहते म्हणाले, मॉर्डन मंगळसूत्र

Reel Star Death: प्रसिद्ध महिला रिलस्टारची हॉटेलमध्ये आत्महत्या, तपासातून धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT