Turkey Earthquake Video Saam TV
देश विदेश

Turkey Earthquake Video : 'मला वाचवा...; जीवाच्या आकांताने ओरडतोय ढिगाऱ्याखाली अडकलेला तरुण, पाहा व्हिडिओ

मला वाचवा, मला जगायचं आहे. असं म्हणतं हा तरुण मदत मागताना दिसत आहे.

Ruchika Jadhav

Turkey Earthquake Video : सोमवारी रात्री सर्व साखर झोपेत असताना तुर्कीमध्ये मोठी दुर्घटना घडली. भूकंपाच्या तिव्र झटक्यांमुळे येथे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत तुर्कीमध्ये २८४ आणि सीरियामध्ये २३७ व्याक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.(Latest Turkey Earthquake Video News)

तर ५१६ व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. आतापर्यंत या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र नुकताच समोर आलेला एक व्हिडिओ काळजात धडकी भरवणारा आहे.

या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ त्याने स्वत: शेअर केला आहे. यात तो म्हणत आहे की, मला वाचवा, मला जगायचं आहे. असं म्हणतं हा तरुण मदत मागताना दिसत आहे. तो सध्या ढिगाऱ्याखाली अडकला आहे. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हा तरुण एक युट्यूबर आहे. YouTuber Charmquel Atrapado en Teramoto असं त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे.सीरियातील अलेप्पो या ठिकाणी भूकंपाने मोठा विध्वंस झाला आहे. सध्या समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त व्यक्तींचे निधन झाले असल्याची शक्यता आहे. तसेच जखमींच्या संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे.

भूकंप झाल्यास काय करावे?

>> तात्काळ आजूबाजूला असलेल्या एखाद्या टेबलाखाली बसावं. आपलं डोकं त्याखाली झाकलं जाईल अशा स्थितीत बसावं.

>> सर्वात आधी भूकंप झाल्यास अशा परिस्थितीत डोकं शांत ठेवावं आणि घाबरू नये.

>> जोपर्यंत भूकंपाचे धक्के बसणे थांबत नाहीत, तोपर्यंत टेबलाखालीच राहावे

>> भूकंपाचे हादरे थांबल्यानंतर तात्काळ घर किंवा ऑफिस किंवा खोलीबाहेर पडावे.

>> भूंकपावेळी वाहनामध्ये असल्यास तात्काळ ते थांबवावे. धक्के थांबत नाहीत तोपर्यंत आतमध्येच बसून राहावे.

>> घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर निघताना लिफ्टचा वापर करू नये. बाहेर आल्यानंतर झाड, भिंत किंवा खांबापासून दूर राहावे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT