अरे बापरे रे! ह्दयविकाराचा झटका आलेली महिला ४५ मिनिटांत झाली जिवंत Saam Tv
देश विदेश

अरे बापरे रे! ह्दयविकाराचा झटका आलेली महिला ४५ मिनिटांत झाली जिवंत

एखाद्याच्या मृत्यूनंतर परत जिवंत होणे हे एक चमत्कारापेक्षा कमी नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : एखाद्याच्या मृत्यूनंतर परत जिवंत होणे हे एक चमत्कारापेक्षा कमी नाही. अमेरिकेमध्ये सध्या असेच प्रकरण समोर आले आहे. अमेरिकेच्या मॅरिलँड या ठिकाणी राहणारी महिला मृत्यूनंतर ४५ मिनिटांनी परत जिवंत झाल्याचे दिसून आले आहे. सध्या ही घटना सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मृत्यूनंतर कुणाचे जिवंत होणे ही अशक्य अशी गोष्ट आहे.

परंतु, अमेरिकेतील या चमत्कारीत प्रकाराने डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. द मिरर यांच्या सांगितलेल्या रिपोर्टनुसार असे सांगितले जाते की, मृत्यूनंतर जिवंत झालेल्या या महिलेचे नाव कॅथी पैटन असे आहे. कॅथी ही गोल्फ खेळत होती. तेव्हा तिच्या मोबाईलवर तिच्या मुलीचा कॉल आला आणि तिने सांगितले तिच्या पोटात वेदना होत आहेत.

हे देखील पहा-

यानंतर कॅथी तातडीने गोल्फ सोडून घरी पोहचली आणि घरामधून मुलीला घेऊन हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. मुलीला उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तितक्यात महिलेला हॉस्पिटल मध्येच ह्दयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात त्या खाली कोसळले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांना लक्षात आले. परंतु, ४५ मिनिटांनी कॅथी ही परत जिवंत झाली.

तोपर्यंत दुसरीकडे त्यांच्या मुलीनेही एका गोंडस मुलीला देखील जन्म दिला आहे. जेव्हा कॅथीला ह्दयविकाराचा झटका आला आणि त्या खाली कोसळले. तेव्हा तात्काळ उपस्थित डॉक्टरांनी त्या महिलेची चाचणी करण्यात आली. तेव्हा कॅथीचे पल्स चालत नव्हते. आणि त्यांच्या मेंदूला देखील ऑक्सिजन मिळत नव्हतं. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेला अर्ध्यातासपेक्षा जास्त सीपीआर देण्यात आला.

यानंतर अचानक ४५ मिनिटांनी त्यांच्या शरीराने हालचाल करण्यास सुरुवात केली. तेव्हा डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले. सुदैवाने कॅथीचा जीव देखील यामध्ये वाचला आहे. या प्रकारानंतर कॅथीने प्रतिक्रिया दिली की, देवाने मला नवे जीवदान दिले आहे. आयुष्य जगण्याकरिता दुसरी संधी मिळाली आहे.

मी देवाचे देखील आभार मानत आहे. माझ्या या नवीन जीवनाकरिता मी खूप खुश आहे असे ती म्हणाली. तर घडलेला प्रकार कॅथीच्या मुलीला समजताच तीदेखील आनंदी झाली आहे. माझ्या आईला माझ्या मुलीचा चेहरा बघायचा आहे. म्हणून तिला नवे आयुष्य मिळाले आहे. मी त्याबद्दल खूप खूप आनंदीत आहे असे कॅथीच्या मुलीने यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT