Uddhav Thackeray Vs Eknath Shinde News Supreme Court Saam Tv
देश विदेश

Maharashtra Politics : शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात होणार सुनावणी; दोन्ही गट समोरासमोर करणार युक्तिवाद

Maharashtra Political News : शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. १२ डिसेंबर २०२२ ला ही सुनावणी होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Shivsena Latest News: ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. १२ डिसेंबर २०२२ ला ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट हे समोरासमोर युक्तिवाद करणार आहेत. दोन्ही गटांचे वकील हे निवडणूक आयोगासमोर (Election Commission Of India) युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे एकिकडे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना दुसरीकडे आता निवडणूक आयोगासमोरही शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde News)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं होतं. धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांनी आपापला दावा सांगितला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं. याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोबतच निवडणूक आयोगासमोरही सुनावणी सुरू होणार आहे.

 शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठविल्यानंतर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 'निवडणूक आयोगाने आमचं म्हणणं ऐकूण न घेता निर्णय घेतला, असा दावा ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे. (Latest Marathi News)

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणीही पुन्हा लांबणीवर

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणीही लांबणीवर गेली आहे. शिवसेना कुणाची? १६ आमदार पात्र की अपात्र? अशा विविध मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात राजकीय लढाई सुरू आहे. आज म्हणजेच मंगळवारी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर महत्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती आहे. पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती सुनावणीसाठी उपलब्ध नसल्यानं सुनावणी लांबणीवर पडल्याचं सांगितलं जातंय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Yoga Exercise: फिट राहण्यासाठी सकाळी करा फक्त ही 5 योगा

Konkan Kanya Express: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! आता सीट पक्कीच समजा; ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे

Nashik News: नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात ACB ची मोठी कारवाई, महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

Success Story: मल्टी नॅशनल कंपनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षेची तयारी केली, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश; IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT