Lakhimpur Kheri Case  Saam Tv
देश विदेश

लखीमपूर खेरी प्रकरण; आशिष मिश्रांवरील आरोपांवर आज सुनावणी

खीमपूर खेरी प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: लखीमपूर खेरी प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. आशिष मिश्रांवर लावण्यात आलेले आरोप (Allegation) सिद्ध करण्यासाठी आज जिल्हा न्यायालयात (court) सुनावणी पार पडणार आहे. याअगोदर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) आशिष मिश्रांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. तसेच एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

हे देखील पाहा-

यानंतर मुदत संपण्याचा एक दिवस अगोदरच आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांनी रविवारी आत्मसमर्पण केले आहे. मागील वर्षी ३ ऑक्टोबर दिवशी शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर (Lakhimpur) खीरी येथील टिकुनिया गावात ही घटना घडली होती. यामध्ये थार गाडीने शेतकऱ्यांना (farmers) चिरडले होते. ही गाडी आशिष मिश्रा यांची असल्याचा आरोप आहे. मागील वर्षी ३ ऑक्टोबर दिवशी शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान थार गाडीने शेतकऱ्यांना (farmers) चिरडले होतं.

आशिष मिश्रा यांच्यावर हत्येसह अनेक गंभीर कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. आशिष मिश्रा यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, त्याबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर १८ एप्रिल दिवशी सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द केला होता.

आशिष मिश्रांवर काय आरोप?

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याच्या काही साथीदारांवर ४ शेतकऱ्यांना थार जीपने चिरडून त्यांच्यावर गोळीबार करणे असे अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने ५ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ही घटना सुनियोजित कट असल्याचे एसआयटीने म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT