havaman andaj marathi today Saam TV
देश विदेश

Havaman Andaj: वेस्टर्न डिस्टर्बन्सने वाढवलं शेतकऱ्यांचं टेन्शन; आज १३ राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

Weather Update Today: स्कायमेटच्या अहवालानुसार, 18 जानेवारी 2024 रोजी देशाच्या पूर्वेकडील भागात, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Satish Daud

Havaman Andaj Marathi Today

डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून अनेक राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट आली आहे. पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये किमान तापमान 2 अंशांवर पोहोचले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याचबरोबर तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि राजस्थानमधील अनेक भागात तापमान 6 ते 10 अंशांवर आलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढला असून मराठवाड्यासह विदर्भातील तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आला आहे.

त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली असून अनेक भागात शेकट्या पेटल्या आहेत. मुंबईसह पुण्यातही थंडीचा प्रभाव वाढला आहे. बदलापूरमध्ये बुधवारी तापमानाचा पारा 9 अंशावर आला होता. एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना, दुसरीकडे काही भागात अवकाळी पावसाचा इशाराही (Heavy Rain) देण्यात आला आहे.

हवामान खात्यानुसार, 18 जानेवारी रोजी बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

स्कायमेटच्या अहवालानुसार, 18 जानेवारी 2024 रोजी देशाच्या पूर्वेकडील भागात, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याशिवाय बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या काही भागात आज आणि उद्या हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्कीममध्ये वेगळ्या ठिकाणी गारपीटीचा इशारा देण्यात आलाय.

अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडूचा दक्षिण भाग आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात सकाळ आणि रात्री दाट ते दाट धुके पडू शकते. महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास, राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहणार असून तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT