Haryana Sonipat Accident News  Saam TV
देश विदेश

Accident News: भयंकर! सुसाट कारने दुचाकीसह स्कूटीला उडवलं; भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

Sonipat Accident News: सुसाट वेगात असलेल्या कारने समोरून येत असलेल्या दुचाकीसह स्कूटीला जोरदार धडक दिली. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Satish Daud

Haryana Sonipat Accident News

सुसाट वेगात असलेल्या कारने समोरून येत असलेल्या दुचाकीसह स्कूटीला जोरदार धडक दिली. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात शनिवारी (२७ जानेवारी) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. तसेच अपघातातील (Accident News) जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अमर, दल बहादूर, अर्जुन, कमल आणि दिल बहादूर, अशी मृतांची नावे आहेत. मृत व्यक्ती मूळचे नेपाळचे रहिवासी होते. काहीच दिवसांपूर्वी ते सोनीपत येथील हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होते. (Latest Marathi News)

हॉटेलातील काम आटोपून शनिवारी रात्रीच्या सुमारास पाचही युवक स्कूटी तसेच दुचाकीवरून घरी परतत होते. त्याचवेळी मामा-भांजा चौकात आले असता, समोरून भरधाव वेगात आलेल्या इको स्पोर्ट्स कारने त्यांना धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक युवक दूर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाला. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT