Harish Rawat resigns from Congress key posts Saam TV
देश विदेश

राजकारणात मोठा भूकंप! काँग्रेसला जोरदार धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचा २ महत्त्वाच्या पदांचा तडकाफडकी राजीनामा

Harish Rawat resigns from Congress key posts : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी दोन महत्त्वाच्या संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला. जवळचे सहकारी चंदन सिंग जिना यांच्याशी संबंधित ईडी चौकशीनंतर रावत यांनी हा निर्णय घेतला.

Namdeo Kumbhar

Harish Rawat Resigns : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी काँग्रेस पक्षातील आपल्या दोन महत्त्वाच्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आपल्या एका सहकाऱ्याशी जोडलेल्या कथित कॅश आणि दागिन्यांच्या प्रकरणामुळे पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी प्रतिमेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केले. रावत यांनी प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी सदस्यत्व आणि काँग्रेस कार्यसमितीच्या (CWC) स्थायी आमंत्रित सदस्यत्वावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांचे कार्यकारी विभाग प्रमुख (ओएसडी) आणि जवळचे सहकारी चंदन सिंग जिना यांची ईडीकडून) चौकशी सुरू आहे. चंदन यांच्या घरातून ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड, सोने, चांदी व मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यानंतर काही तासातच हरिश रावत यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.

हरीश रावत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत, त्यावेळी त्यांच्या पीएवरील आरोपांमुळे पक्षाला हानी पोहोचू शकते. त्यामुळे उत्तराखंड प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी सदस्य आणि राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या स्थायी निमंत्रित सदस्य पदाचा राजीनामा जाहीर देत आहे.

माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निर्णयाचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, राहुल गांधी सध्या 'छात्रो की गुंज' या कार्यक्रमाद्वारे देशभरातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात मोठा लढा देत आहेत. त्यामुळे पक्षाच्या या लढ्याला कोणताही धक्का लागू नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. सध्या माझ्याकडे कोणतेही सरकारी पद नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्न येत नाही. पण मी उत्तराखंड काँग्रेसचा कार्यकारी सदस्य आणि राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीचा स्थायी सदस्य आहे. माझ्या पदामुळे पक्षाच्या भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये, म्हणून मी या दोन्ही संघटनात्मक पदांवरून स्वतःहून बाजूला होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनात धनंजय मुंडे भेटीसाठी दाखल

Surya Gochar 2026: नवरात्रीत 5 राशींच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! काम-धंद्यात अडचणी, प्रेमातही वाढणार तणाव

Pune Fort : महाराष्ट्रातील 'हा' किल्ला सतरंगी मातीमुळे प्रसिद्ध, पठारावर दिसतो निसर्गाचा चमत्कार

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CJP च्या आंदोलनादरम्यान धक्कादायक घटना; आंदोलनकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT