Health workers in protective gear treating Ebola patients amid rising outbreak fears in Africa. saam tv
देश विदेश

हंटा नंतर इबोलाचा कहर! आता पर्यंत 80 हून अधिक मृत्यू, जगभरात भीतीचं सावट

Symptoms Of Ebola Virus Explained In Detail: हंटा व्हायरसनंतर आता इबोला व्हायरसचा जगभरात उद्रेक झालाय. जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढलीये. कारण या व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय... हा इबोला व्हायरस काय आहे? कोरोनानंतर पुन्हा एकदा जगाचं कसं टेन्शन वाढलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

कोरोनाच्या भयंकर अनुभवानंतर आता जगावर आणखी एका जीवघेण्या व्हायरसचे संकट घोंगावतंय. 'इबोला' या प्राणघातक विषाणूचा जगभरात उद्रेक झालाय. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, जागतिक आरोग्य संघटनेला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करावी लागलीय...या व्हायरसमुळे आतापर्यंत 80 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय...आफ्रिकेतील काँगो आणि शेजारील युगांडामध्ये इबोला विषाणूने थैमान घातलयं... हा व्हायरस नेमका कसा पसरतो आणि त्याचे काय परिणाम होतात? पाहुयात...

काय आहे इबोला व्हायरस?

- इबोला जगातील घातक विषाणू, मृत्यूचं प्रमाण 50 ते 90%

- बाधित व्यक्तीच्या रक्त, घाम किंवा लाळेच्या संपर्कात आल्यानं विषाणूचा प्रसार

- अचानक तीव्र ताप येणं, स्नायू दुखणं, थकवा आणि घसा खवखवणं

- आजार बळावल्यास उलट्या, जुलाब आणि किडनीसह यकृत निकामी होऊन अंतर्गत रक्तस्त्राव

आतापर्यंत इबोलाचा 'झायर' स्ट्रेन हा सर्वाधिक भयानक विषाणू मानला जायचा...मात्र त्या व्हायरसवर लस उपलब्ध आहे. मात्र यावेळचा उद्रेक इबोलाच्या 'बुंदिबुग्यो' या अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक स्ट्रेनमुळे झालाय... सर्वात चिंतेची बाब म्हणजे, या नव्या स्ट्रेनवर अद्याप कोणतीही अधिकृत मान्यताप्राप्त लस किंवा निश्चित औषध उपलब्ध नाही. यामुळेच आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सध्या काँगोच्या पूर्व भागात असलेल्या 'इटुरी' प्रांतात या जीवघेण्या आजाराने सर्वाधिक थैमान घातलयं...बुनिया, र्‍वामपारा आणि मोंगब्वालू या तीन आरोग्य क्षेत्रांमध्ये 246 संशयित रुग्ण आढळलेत. युगांडात ही इबोलाचे रुग्ण आढळलेत...त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या संकटातून जग कुठे सावरत नाही, तोच इबोलाच्या या नव्या स्ट्रेनने जागतिक आरोग्य यंत्रणांची परीक्षा घ्यायला सुरुवात केलीय. जरी हा उद्रेक सध्या आफ्रिकेपूरता मर्यादित असला, तरी हा संसर्गजन्य व्हायरस असल्यानं विमान प्रवासामुळे इतर देशांमध्येही व्हायरस पसरु शकतो. यासाठी आरोग्य विभागांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आधीच आखाती युद्धामुळे इंधन कोंडी होऊन जगावर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशातच 'इबोला' व्हायरसमुळे आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याचं आव्हान सर्वच देशांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT