Gyanvapi Masjid Case Latest News Saam Tv
देश विदेश

ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात; लवकरच होणार सुनावणी

ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी आता फास्टट्रॅक कोर्टात वर्ग करण्यात आली आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरणाची सुनावणी आता फास्टट्रॅक कोर्टात होणार आहे. न्यायाधीश मयंक पांडे या खटल्याची सुनावणी करणार आहेत. ३० मेपासून या प्रकरणी सुनावणी सुरु होणार आहे. या संबंधीत असणाऱ्या सर्व सुनावणी आता फास्टट्रॅक कोर्टात होणार आहे. 'शिवलिंग' ची पूजा संबंधीत असणाऱ्या याचिकेवर सुनावणी फास्टट्रॅक कोर्टातच होणार आहे. (Gyanvapi Masjid Case Latest News)

फास्टट्रॅक कोर्टात तीन याचिकांवर सुनावणी होणार आहे. यातली पहिली याचिका ज्ञानवापी मशीद (Masjid) परिसरात मुस्लिमांना प्रवेशावर बंदी घालण्याची याचिका आहे. तर दुसऱ्या याचिकेत ज्ञानवापी संकुल हिंदुच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. तिसऱ्या याचिकेत ज्ञानवापी कॅम्पसमध्ये पूजापाठ सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. याशिवाय ज्ञानवापी मशिदीचा घुमट पाडण्याची मागणीही नव्या याचिकेत करण्यात आली आहे.

विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांच्या पत्नी किरण सिंह आणि विश्व वैदिक सनातन संघाचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस यांच्या वतीने वाराणसी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रविकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात (Court) याचिका दाखल करण्यात आली होती.(Gyanvapi Masjid Case Latest News)

उद्या होणार जिल्हा कोर्टात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी सर्वेक्षणाशी संबंधित प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी २६ मे रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना सर्वेक्षण अहवालावर आक्षेप नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.(Gyanvapi Masjid Case Latest News)

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; 5 आरोपींना मुंबई गुन्हे शाखा उद्या कोर्टात हजर करणार

Thursday Horoscope: धनलाभाचे योग अन् नात्यांत गोडवा; या ४ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले? जरांगे आरोपांचे पुरावे देणार?

शूटर १५ तासांत जेरबंद पण मास्टरमाइंड कोण? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT