Gyanvapi Masjid Case Saam Tv
देश विदेश

ज्ञानवापी मशिदीसमोर नमाजसाठी गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

आज अलाहाबाद कोर्टात ज्ञानवापीशी संबंधित प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणी ६ जुलैपर्यंत स्थगीत करण्यात आली आहे.

साम वृत्तसंथा

वाराणसी : उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाने ज्ञानवापी मशिद सील करण्याचा आदेश दिले आहेत. दुसरीकडे ज्ञानवापी मशिदीत शुक्रवारची नमाजही होणार असून, त्यासाठी तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नमाजसाठी लोकांची गर्दी वाढली आहे. दरम्यान आज अलाहाबाद न्यायालयात ज्ञानवापीशी संबंधित प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणी ६ जुलैपर्यंत स्थगीत करण्यात आली आहे. (Gyanvapi Masjid Case)

अलाहाबाद उच्च न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर या प्रकरणावर ६ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ३१ वर्षांपूर्वी १९९१ मध्ये दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी करता येईल की नाही, याचा निर्णय उच्च न्यायालयाने घ्यायचा आहे. या प्रकरणी शेवटची सुनावणी १६ मे रोजी झाली होती. गेल्या सुनावणीत हिंदू पक्षाचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. ती पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम पक्ष आपले युक्तिवाद मांडतील.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुंच्या बाजुची चर्चा पूर्ण झाली आहे. आज उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे वकील पुनीत गुप्ता यांनी आपली बाजू मांडली, ते पुढील सुनावणीतही युक्तिवाद करणार आहेत. (Gyanvapi Masjid Case)

ज्ञानवापी येथे शुक्रवारच्या नमाजासाठी गर्दी झाली आहे. आधी ३० लोक नमाज अदा करत असल्याची माहिती होती, पण आता ७०० लोक नमाजसाठी मशिदीत आल्याचे बोलले जात आहे. यानंतर मशिदीचे गेट बंद करण्यात आले आहे. लोकांना दुसऱ्या मशिदीत जाण्यास सांगितले जात आहे.

१००० फोटो, काही तासांचे व्हिडिओ; १२ पानी अहवाल सादर

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Mosque) प्रकरणी न्यायालयाचे विशेष आयुक्त विशाल सिंह यांनी आपला पाहणी अहवाल सादर केला आहे. १२ पानांचा हा अहवाल १४ ते १६ मे दरम्यान केलेल्या सर्वेक्षणाचा आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

१२ पानांचा हा अहवाल आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या अहवालात नेमक काय आहे. याची माहिती अजुनही दिलेली नाही. (Gyanvapi Mosque Survey Report)

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT