Gyanvapi Case Saam TV
देश विदेश

Gyanvapi Virdict: ज्ञानवापी प्रकरणी मोठा निर्णय, न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली

ज्ञानवापी प्रांगणात असलेल्या देवी शृंगार गौरीच्या नियमित दर्शन तसेच पूजेबाबत जिल्हा न्यायालय आज महत्वपुर्ण सुनावणी झाली.

Jagdish Patil

शिवाजी काळे -

वाराणसी: ज्ञानवापी (Gyanvapi) प्रांगणात असलेल्या देवी शृंगार गौरीच्या नियमित दर्शन तसेच पूजेबाबत वाराणसी जिल्हा न्यायालय (Varanasi District Court) आज महत्वपुर्ण सुनावणी झाली. या सुनावणी वेळी कोर्टाने आज मुस्लीम पक्षाची मागणी फेटाळत हिंदू पक्षाची याचिका स्वीकारली आहे.

आजची घडामोड ही ज्ञानवापीच्या इतिहासामधील मोठी घडामोड असल्याचं बोललं जात आहे. शिवाय या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

काय आहे प्रकरण -
ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर असणाऱ्या हिंदू देवतांच्या मूर्तींच्या दैनंदिन पूजेसाठी परवानगी मागणारी याचिका पाच महिलांनी दाखल केली होती. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने ज्ञानवापी मशीद ही वक्फ मालमत्ता असल्याचे म्हटलं आहे.

त्यामुळे याचिकेच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तर मंदिर पाडून ही मशीद बांधण्यात आली असल्याचं मुद्दा हिंदू पक्षाचे वकीलांनी उपस्थित केला होता. या प्रकरणी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आजच्या सुनावणीमध्ये जिल्हा न्यालयाने मुस्लीम पक्षाची मागणी फेटाळत हिंदु पक्षाची याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे आजचा हा निर्णय मोठा असल्याचं बोललं जात आहे. तर या संदर्भातील पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT