Madras Court On Mandir Saam Digital
देश विदेश

Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणात मोठी अपडेट; हिंदू पक्षाला मिळाली तहखान्यात पूजा करण्याची परवानगी

Gyanvapi Case Update: ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल लागला आहे. या प्रकरणात आता ज्ञानवापी तहखान्यात हिंदू पक्षाला पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे.

Vishal Gangurde

Gyanvapi Case Update:

ज्ञानवापी प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल लागला आहे. या प्रकरणात आता ज्ञानवापी तहखान्यात हिंदू पक्षाला पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे. (Latest Marathi News)

वारणसीच्या ज्ञानवापीत व्यासजीच्या तहखान्यात पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे. या प्रकरणात जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टात दोन्ही पक्षांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणात बुधवारी त्यांचा निर्णय दिला. या प्रकरणात हिंदू पक्षाला तहखान्यात पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंदू पक्षाचे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी म्हटलं की, आज व्यासजीच्या तहखान्यात पूजा करण्यचा अधिकार देण्यात आला आहे. कोर्टाने एका आठवड्याच्या आत जिल्हा अधिकाऱ्यांना आदेशाचं पालन करण्यास सांगितलं आहे'.

दरम्यान, व्यासजीच्या तहखान्याचा ताबा जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मंगळवारी कोर्टात अंजुमन इंतेजामिया मस्जिदच्या तर्फे अधिवक्ता मुमताज अहमद आणि एखलाक अहमद यांनी म्हटलं की, व्यासजीचा तहखाना मशिदीचा हिस्सा आहे. त्यामुळे त्यात पूजा करण्याचा अधिकार देता येणार नाही. तहखाना हा वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. त्यामुळे पूजा करण्याची परवानगी देऊ नये'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक कांड, नामांकित कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार अन्...

Dhurandhar 2 Leak Online: बॉक्स ऑफिसवर गाजणारा 'धुरंधर २' ऑनलाइन लीक; रणवीर सिंगकडून संताप, महाराष्ट्र सायबरकडून मोठी कारवाई

Summer Skin Care : ना पपई, ना केळी; उन्हाळ्यात लावा 'या' फळाचा फेसपॅक, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

BSNL: फक्त १ रुपयांत ३० दिवस फ्री कॉलिंग, दिवसाला २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस

बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत बँकेच्या अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT